घरपालघरटाकाऊ मडक्यापासून सेल्फी पॉईंटची निर्मिती

टाकाऊ मडक्यापासून सेल्फी पॉईंटची निर्मिती

Subscribe

यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय वस्तू पुनर्वापर केंद्र उभारली आहेत. या केंद्रात आलेल्या साहित्यांवर आवश्यक दुरुस्ती काम करून ते गरजूंना दिले जाते.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये नवरात्री आणि छटपूजेनिमित्त विसर्जित करण्यात आलेले रंगीबेरंगी मडकी गोळा करून महापालिकेने मीरा रोड येथे सेल्फी पॉईंटचे उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिक देखील फोटो काढण्याचा मोह पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. मीरा- भाईंदर शहरातून टाकाऊ स्वरूपात निघणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे महापालिकेचा कल आहे. यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय वस्तू पुनर्वापर केंद्र उभारली आहेत. या केंद्रात आलेल्या साहित्यांवर आवश्यक दुरुस्ती काम करून ते गरजूंना दिले जाते.
त्यानुसार या उपक्रमांतर्गत कचऱ्यामध्ये आढळणाऱ्या वस्तूंना देखील शोभिवंत रूप देण्याची अनोखी संकल्पना प्रशासनाने हाती घेतली आहे. यात नुकतीच खाडी किनारी तसेच तलावाजवळ नवरात्र व छटपूजा निमित्त वापरण्यात आलेली मडकी एकत्र करून ती मीरा रोड येथील हैदरी चौक भागात ठेवण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या मडक्यांची मांडणी आकर्षित रित्या करून त्या मध्यभागी नागरिकांना उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ही मटकी पाहून तेथे फोटो काढण्यासाठी जमणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाटत असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -