घरपालघरशिवसेनेचे अमोल पाटील मोखाड्याचे नगराध्यक्ष

शिवसेनेचे अमोल पाटील मोखाड्याचे नगराध्यक्ष

Subscribe

शिवसेना व जिजाऊ यांनी मोखाडा विकास आघाडी करून शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पाटील यांना उमेदवारी दिली होती.

मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना व जिजाऊ यांनी मोखाडा विकास आघाडी करून शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पाटील यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडीच्या प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपनगराध्यक्षदी शिवसेनेचेच नवसू दिघा यांचीही बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, माजी नगराध्यक्षा महानंदा पाटील, वासुदेव खंदारे,पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ, देविदास काकड, रोहित चक्रवर्ती यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते.

गेल्यावेळी तेरा नगरसेवक निवडून आल्यामुळे शहरात विकासाची अनेक कामे केली. परंतु यावेळी एकहाती सत्ता मिळाली नाही. पण, जिजाऊच्या साथीने मोखाड्यावर भगवा फडकल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद आहे. येत्या सहा महिन्यात नळपाणी योजनेचे काम सुरु होईल. बारा पाड्यांना स्ट्रीट लाईटचही सुविधा दिली आहे.
– प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य

- Advertisement -

जिजाऊचे निलेश पडवले नगराध्यक्षपदी नियुक्त

विक्रमगड नगरपंचायतीत एकहाती सत्ता असलेल्या जिजाऊचे निलेश पडवले नगराध्यक्षपदी तर महेंद्र पाटील उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ पैकी सहा जागा जिजाऊ पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडी आणि श्रमजीवी संघटनेच्या युतीने जिंकल्या आहेत. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले असून इतर पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. निवडीनंतर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.

- Advertisement -

भाजपच्या साथीने माकप सत्तेवर

तलासरी नगरपंचायतीत भाजपने साथ दिल्याने माकपचे सुरेश भोये नगराध्यक्ष तर सुभाष दुमाडा उपनगराध्यक्षपदी निवडून आले. त्रिशंकू अवस्था असलेल्या तलासरीत शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपने पारंपारिक राजकीय वैरी असलेल्या माकपला बिनशर्त पाठिंबा दिला. तलासरीत माकपने सहा, भाजपने सहा, शिवसेनेने तीन तर जिजाऊने दोन जागा जिंकल्या आहेत. १७ सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतीत कुणालाही स्पष्ट बहूमत नसल्याने त्रिशंकू अवस्था झाली होती. शिवसेनेने माकपला बाजूला ठेऊन जिजाऊसोबत स्वतंत्र गट स्थापन करून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवार मैदानात उतरवले होते. माकपने आपले उमेदवार उतरवले होते. भाजपने निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे भाजपची भूमिका निर्णायक ठरणार होती. माकपशी भाजपचे यापरिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय वैर आहे. तर शिवसेनेशीही भाजपचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे भाजप नक्की कुणाच्या बाजूने जातेय याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपने माकपच्या बाजूने मतदान करुन शिवसेनेला सत्तेपासुन दूर रोखण्याचे काम केले आहे. माकप, भाजपच्या या जवळकीमुळे जिल्ह्यात नव्या समीकरणाला सुरुवात झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

(ज्ञानेश्वर पालवे हे मोखाडा, नंदकुमार बरफ हे विक्रमगड तर कुणाल लाडे हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

कोरोनातही रेल्वेने तिकिटाचे पैसे मागितले, आदित्य ठाकरेंचे पंतप्रधानांच्या आरोपाला प्रत्यूत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -