घरताज्या घडामोडीराज्याला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं महत्त्वाचं - रवी राणा

राज्याला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं महत्त्वाचं – रवी राणा

Subscribe

महाराष्ट्रातील परिस्थिती आणि नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भाजपचे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. तसेच राज्याला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं महत्त्वाचं आहे, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करणं महत्त्वाचं

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहीलेला नाहीये. राष्ट्रपती शासन लागू होईल, अशी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे. आज या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं महत्त्वाचं आहे. ज्या मंत्र्यांनी घोटाळा केलेला आहे. त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे. हे सरकार तीन तिघाडी सरकार असून कोणाचाही ऐकमेकांना ताळमेळ नाहीये. त्यामुळे जे नेते गजाआड जातील आणि जे नेते जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, हे सरकार स्वत:च सरकार बर्खास्त करतील आणि राष्ट्रपती राजवट लागू करतील, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अनिल परब यांची फाईल तयार

रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकार अस्थिर आहे. महगाराष्ट्राची परिस्थिती बंगाल सारखी करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने बंगालमध्ये क्राईम वाढत आहे आणि लोकं सुरक्षित नाहीयेत. त्याच धरतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे. ज्या पद्धतीचं राजकारण राज्यात सुरू आहे. त्याचीच करणी त्यांना भरावी लागणार आहे. नवाब मलिकांनंतर अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची फाईल तयार आहे. त्यांना लवकरच ईडीकडून अटक करण्यात येईल.

अवमानाविरोधात कारवाई न करता माझ्यावर कारवाई

महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना हाताशी ठेवून ज्या पद्धतीने ३०७ सारखा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या शिवभक्तांनी बसवला होता. मात्र, अमरावती महापालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री छन्नी हातोडीने काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला. त्या अवमानाविरोधात कारवाई न करता माझ्यावर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, पंधरा दिवसानंतर मी अमरावतीमध्ये जात असून त्याठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहोत. तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर प्रशासनाविरोधात निषेध रॅली काढण्यात येईल, असं रवी राणा म्हणाले.


हेही वाचा : Ukraine Indian student: युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी मानले सरकारचे आभार, युक्रेनमधून १८२ विद्यार्थी भारतात परतले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -