घरपालघरजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडांची कत्तल

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडांची कत्तल

Subscribe

तर याच ठिकाणी सीआरझेड जागेवर उत्खनन परवानगी दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये चौकशी सुरू केली होती. ती सुद्धा आतापर्यंत गुलदस्त्यातच आहे.

भाईंदर :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मीरा- भाईंदर शहरातील विकासक व जमीनमालक गोपाळ द्विवेदी यांनी सीआरझेड -१ जागेत असलेल्या मँग्रोव्ह झाडांसह अन्य झाडांची बेसुमार कत्तल केल्याची तक्रार आहे. असे असतानाही त्याकडे पालिका, पोलीस व महसूल विभागाने बघ्याची भूमिका घेतलेली असल्यानेच विकासक पर्यावरणाच्या जीवावर उठले आहेत,अशी चर्चा आहे. तर याच ठिकाणी सीआरझेड जागेवर उत्खनन परवानगी दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये चौकशी सुरू केली होती. ती सुद्धा आतापर्यंत गुलदस्त्यातच आहे.

सीआरझेड -१ परिसर असतानाही मौजे. नवघर येथील सर्व्हे क्रं. नवीन ३५ (जुना २४४ ), ३२ (२४३), ३६ (२४७) व ३७ (२४६) आणि ३८ (७५६) याच जागेवर मुंबई उच्च न्यायालय व हरित लवादाच्या आदेशानुसार सीआरझेड – १ परिसरात कुठलेच खोदकाम व उत्खनन करण्या अगोदर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत.असे असतानाही त्या आदेशाला धुडकावून बेकायदा हजारो ब्रास भरणी करण्यासाठी तत्कालीन अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून चुकीचे अहवाल बनवून परवानगी दिली होती. त्यावरूनच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये अपर तहसीलदार यांची चौकशी सुरू केली होती. मात्र ती चौकशी पुढे झालीच नाही फक्त बदली करण्यात आली आहे. सदरील प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे जाताच अपर तहसीलदार जागेवर जाऊन त्यांनी स्वतः तिथली परवानगी रद्द केली. मात्र पर्यावरणाचा ह्रास केल्या प्रकरणी गुन्हा मात्र अद्यापही दाखल केलाच नाही. तसेच उत्खनन करण्याची परवानगी घेऊन दिवस रात्र भरणी केली . त्याचाही अहवाल दडपून टाकला आहे.

- Advertisement -

नवघर गावाच्या पाठीमागील व इंद्रलोक पोलीस चौकीच्या समोर भागातील सीआरझेड भागात असलेल्या ठिकाणी नैसर्गिक असलेला तलाव ’लुणार लेक’ चा सर्व्हे क्रं. १४ ( २०८), १६ (२१०) व शेजारील सर्व्हे क्रमांकात असलेल्या जागेवर भरणी करून तलाव नष्ट केला आहे. तर दुसरीकडे सर्व्हे क्रं. २६ (२३४), २७ (२२९), २५ (२३३) या ठिकाणी बिल्डर मनोज पुरोहित यांनी सात ते आठ एकर वर भरणी करून पालिकेचा नैसर्गिक वाहणारा नाला सुद्धा वळविला आहे आणि तिथे बेकायदा कंपन्या बसविल्या आहेत. त्याठिकाणी विकासकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे व शेड उभारून करून औद्योगिक वसाहत निर्माण केली आहे, त्याठिकाणी त्यांनी कांदळवनाची झाडांची बेसुमार कत्तल करत काही झाडे जाळल्याचा प्रकारही झाला आहे. तसेच भाईंदर पश्चिमेच्या राधा स्वामी सत्संगच्या पाठीमागे गुन्हा दाखल झालेल्या जागेतच कांदळवन क्षेत्रात दिवसरात्र भरणी सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असून त्यावर अद्यापही गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले नाहीत.

एकीकडे जमिनीची होणारी धूप व वाढते तापमान रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करून झाडे लावत आहे.तर दुसरीकडे मात्र खासगी विकासकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मात्र झाडांची बेसुमार कत्तल चालविली आहे. जगात मागेच कोरोना महामारीने ऑक्सिजनचे महत्व पटवून दिले आहे. विशेष म्हणजे सर्वत्र प्राणवायू (ऑक्सिजन) ची कमतरता असताना विकासकांनी जुन्या झाडांची मुळासकट कत्तल केल्याची गंभीर घटना घडली आहे. तरी सुद्धा विकासकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देऊन कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार्‍या झाडांची व शासनाने बंदी घातलेल्या मँग्रोव्ह झाडांची सुद्धा बंदीस्त पत्रे लावून खुलेआम कत्तल केली जात आहे. हा महाभयंकर मनुष्यवधच आहे, असे पर्यावरण प्रेमी आणि गो – ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साबीर सय्यद यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जागेवर शेकडो झोपड्या व क्रिकेट टर्फ

एकीकडे जागतिक पर्यावरण दिनाच्या नावाने उपक्रम राबवायचे आणि त्यातून झाडे, जीव, जंगल वाचवायचे सांगून दुसरीकडे मात्र चित्र वेगळेच दाखवायचे. दिवसा ढवळ्या मँग्रोव्ह झाडांसह अन्य झाडांची बेसुमार कत्तल चालविली जात असतानाही त्याकडे पालिका, पोलीस व महसूल यांनी मात्र बघ्याची भूमिका घ्यायची हे ही संशयास्पद आहे,असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कांदळवन व सीआरझेड मँग्रोव्ह झाडे असलेल्या भागातच बसविलेल्या शेकडो झोपड्या व क्रिकेट टर्फ यांना अभय देण्याचे काम चालू आहे.

प्रतिक्रिया,

सदरील जागेवर व सीआरझेड परिसरात महापालिकेकडून कुठलीच परवानगी देण्यात आलेली नाही. जर विकासकाने पालिकेची परवानगी न-घेता झाडे कापली असल्यास त्यांच्यावर उचित कारवाई करणार आहोत.

– नागेश वीरकर, उप – उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -