घरपालघरमीरा- भाईंदरच्या मैदान - उद्यानात होणार ’हिरकणी कक्ष’

मीरा- भाईंदरच्या मैदान – उद्यानात होणार ’हिरकणी कक्ष’

Subscribe

मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातील उद्याने , मैदानात यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रात प्रत्येक मैदानात ,उद्यानात आणि जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी ’हिरकणी कक्ष’ व ओपन लायब्ररी उभारण्याचे काम या महिन्यात सुरु होणार आहे. माता – भगिनींची सोय व्हावी यासाठी या ’हिरकणी कक्ष’ तयार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे काम होणार असून राज्य सरकारकडून सुमारे २० कोटींचा निधी या साठी मंजूर करण्यात आला आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याकरिता ओवळा – माजिवडा येथे विविध ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी होणार आहे. या हिरकणी कक्षात वातानुकूलित स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, सॅनिटरी पॅड्स व सॅनिटीझर वितरक यंत्र, स्वयंचलित फ्लशिंग यंत्र इत्यादी सोयी-सुविधा यात समाविष्ट असणार आहेत. मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातील उद्याने , मैदानात यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे.

त्यामुळे याच महिन्यात कामाला सुरुवात होईल. पुढील ६ ते ८ महिन्यात हे हिरकणी कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मैदाने – उद्याने याशिवाय इतर वर्दळीच्या ठिकाणीही हिरकणी कक्ष तयार करता येतात का यासाठी जागा शोधाव्यात असे आमदार सरनाईक यांनी सुचवले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या, प्रवासात असणार्‍या स्तनदा मातांना आणि कार्यालयात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यासाठी हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना त्याचा फायदा होऊ शकतो. स्तनदामाता आणि बाळांचे आजार यावर मात करण्यासाठी, त्यांना सुविधा मिळावी यासाठी ’हिरकणी कक्ष’ ही संकल्पना फार महत्वाची आहे. मैदाने , उद्याने यासह शहरात वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा कशी मिळेल यासाठीही पूर्ण प्रयत्न केले जातील , असे सरनाईक यांनी पुढे सांगितले.

- Advertisement -

ओपन लायब्ररीही होणार
याच हिरकणी कक्षासोबत ’ओपन लायब्ररी’चे निर्माण होणार आहे. मीरा- भाईंदरच्या उद्याने, मैदाने व मोकळ्या जागा निश्चित करून तेथे ओपन लायब्ररी तयार करण्याचे काम याच महिन्यात सुरु होणार आहे. यासाठी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -