घरपालघरढेकाळे फिडरच्या वीज समस्येसाठी निवेदन

ढेकाळे फिडरच्या वीज समस्येसाठी निवेदन

Subscribe

गावाच्या दोन्ही दिशेला जाणार्‍या विजवाहिन्यांमधून ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.विजेच्या कमी दाबामुळे इलेक्ट्रिक उपकरणे चालत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

मनोर: महावितरणच्या ढेकाळे फिडरवरील दहिसर तर्फे मनोर गावातील विजेच्या समस्या सोडवण्याची मागणी पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.सोमवारी सायंकाळी अधीक्षक अभियंत्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी दहिसर तर्फे मनोरच्या सरपंच अंकिता भोईर, पंचायत समिती सदस्य तुषार पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य साजिद शेख उपस्थित होते. सुमारे चार हजारांची लोकसंख्या आणि दहा पाड्यांना एकाच 300 केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा केला जातो.एकाच ट्रान्सफॉर्मरवर अधिक भार असल्याने गावाच्या दोन्ही दिशेला जाणार्‍या विजवाहिन्यांमधून ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.विजेच्या कमी दाबामुळे इलेक्ट्रिक उपकरणे चालत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल लिक होत असल्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मरमधून तलावाच्या दिशेने जाणार्‍या विजवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असून तुटणार्‍या विजवाहिन्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी तेली पाड्यालगतच्या तलावावर 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता. परंतु वीजपुरवठा सुरु केल्यानंतर काही दिवसांनी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने बंद अवस्थेत आहे. बंद पडलेला 100 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करावा, 300 केव्ही ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून ऑइल गळती रोखावी,तसेच ट्रान्सफॉर्मर ते तलावापर्यंतच्या जीर्ण विजवाहिन्या बदलून विज वाहिन्यांची उंची वाढवावी.जीर्ण झालेल्या खांबाची पाहणी करून आवश्यक असलेल्या ठिकाणी खांब बदलण्याची मागणी महावितरणचे अधीक्षक अभियंता पानंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -