घरपालघरकेळवे जलदुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर

केळवे जलदुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर

Subscribe

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्गांत स्थापत्यशास्त्र दृष्टीने अत्यंत महत्वाचा म्हणून गणला जाणारा जंजिरे केळवा (केळवे समुद्र दांडाखाडी) याची सातत्याने दुरवस्था सुरु आहे.

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्गांत स्थापत्यशास्त्र दृष्टीने अत्यंत महत्वाचा म्हणून गणला जाणारा जंजिरे केळवा (केळवे समुद्र दांडाखाडी) याची सातत्याने दुरवस्था सुरु आहे. केळवे पर्यटनाच्या विकासात केळवे प्रांतातील लहान मोठे बुरुज, भुईकोट, जलदुर्ग बाबत काहीही विचार न झाल्याने एक अमूल्य ठेवा नामशेष होण्याच्या प्रवासाला लागला आहे. गेल्या किमान १०० वर्षाहून अधिक काळ या किल्ल्याच्या जतनीकरणासाठी कोणतीही डागडुजी न झाल्याने किल्ल्याच्या पायाकडील बरेचसे चिरेबंदी दगड व त्यावरील चुन्याचा गिलावा यांची मोठ्या प्रमाणावर सातत्याने पडझड होत आहे.

केळवे जंजिरा संवर्धनासाठी शासकीय व पुरातत्वीय पातळीवर उपाययोजना होणे काळाची गरज आहे. जलदुर्गांच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त झालेले गडकोट भुईसपाट होणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
– श्रीदत्त नंदकुमार राऊत, इतिहास अभ्यासक

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत किल्ल्याच्या मागील तटबंदीची झालेली पडझड आता समुद्राच्या लाटांनी अधिकाधिक वाढवली आहे. मुख्य तटबंदीत आधारासाठी असलेले लहान मोठे दगड, माती, चुना गिलावा यांची सातत्याने होणाऱ्या लाटांच्या माऱ्याने झीज, नुकसान होत आहे. किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत, प्रीतम पाटील व संवर्धन मोहिमेचे योगेश पाटील यांनी केलेल्या किल्ल्याच्या आगामी संवर्धन आराखडा नियोजन पाहणीत किल्ल्याच्या तटबंदीच्या चिऱ्यांची पूर्वीपेक्षा अधिक पडझड झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने दुर्गमित्रांनी संवर्धनासाठी पुरातत्वीय दृष्टीने आराखडा निश्चित केला आहे.
यासाठी किल्ले वसई मोहिम व संवर्धन मोहिम केळवे अंतर्गत गेली दीड वर्ष विविध पातळीवर प्रत्यक्षात भेटी घेत आहेत.

केळवे जंजिरा संवर्धनासाठी सातत्याने होणारे श्रमदान आता पुरेसे नसून किल्ल्याच्या मुख्य डागडुजीची आवश्यकता लक्षात येत आहे. नियोजित केलेल्या संवर्धनासाठी लागणारा वेळ, खर्च, मनुष्यबळ लवकरच जाहीर होईल.
– योगेश पालेकर, किल्ले संवर्धन मोहीम

- Advertisement -

किल्ल्याच्या संवर्धनासाठी २००६ साली दोन्ही संघटनांनी महाश्रमदान मोहिम आयोजित करून गडाच्या अंतर्गत भागातील तटबंदीला एकरूप झालेली धोकादायक झाडे काढली होती. संवर्धन मोहीम केळवे व किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत सातत्याने गेली अनेक वर्षे या जलदुर्गाच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहीम आयोजित करण्यात येत आहे. किमान या श्रमदानातून तटबंदीवर उगवलेली अनावश्यक काटेरी झाडे, धोकादायक झाडे काढण्यात येत असल्याने काही भिंती आजही शाबूत आहेत. दरवर्षी केळवे मोहीम विजयदिनाचे औचित्य साधून संवर्धन मोहीम केळवे अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम व भगवा ध्वज मानवंदना देण्यात येत असते.

हेही वाचा –

दिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -