घरताज्या घडामोडीदिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंना दिशा सालियान प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिंडोशी न्यायालयाने दिशा सालियान प्रकरणात निकाल राखून ठेवला होता. काही अटी, शर्थींसह नितेश राणे आणि नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने आज मंजूर केला आहे. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. याविरोधात दिशाच्या आई आणि वडिलांनी राणे पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दिशा सालियान प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायलायने अर्जावर सुनावणी करुन निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी अखेर दिंडोशी न्यायालयाने निर्णय दिला असून नितेश राणे आणि नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नारायण राणेंनी दिशा सालियान प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. दिशाला एका काळ्या रंगाच्या मर्सिडीजमधून घरी नेण्यात आले आणि तिथे तिची हत्या करण्यात आली असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

- Advertisement -

नारायण राणेंच्या आरोपानंतर दिशाच्या आई-वडिलांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली होती. न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. तर आता न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचा निर्णय दिला आहे. राणेंची अटकपूर्व जामीन १५ हजारांच्या जातमुचलक्यावर करण्यात आली आहे.

दिंडोशी कोर्टाने नारायण राणे आणि नितेश राणेंना अटी-शर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता पोलिसांकडून कठोर कारवाई होणार नाही आहे. परंतु राणेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरुच राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल: दिशा सालियानबाबतचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -