घरपालघरसभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव बारगळला

सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव बारगळला

Subscribe

तर महाविकास आघाडीचे संख्याबळ सहा असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन असे एकूण सहा सदस्य संख्या आहे.

वाडा:  वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे व उपसभापती जगदीश पाटील या दोघांवर परस्परविरोधी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी यांनी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात सदस्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला महायुतीचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभापतींवरील तर महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उपसभापतीवरींल अविश्वास ठराव बारगळला आहे.
वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या 12 असून महाविकास आघाडीने पंचायत समितीवर आपली सत्ता स्थापन केली होती. यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले होते.मात्र आता राज्यातील बदलती राजकीय स्थितीमुळे आता महायुतीची सहा सदस्य संख्या आहे. यात भाजप दोन, शिवसेना एकनाथ शिंदे गट दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) दोन अशी एकूण सहा सदस्य संख्या आहे. तर महाविकास आघाडीचे संख्याबळ सहा असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन असे एकूण सहा सदस्य संख्या आहे.

महायुतीने सभापती अस्मिता लहांगे यांच्याविरोधात तर महाविकास आघाडीने उपसभापती जगदीश पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एका पत्राद्वारे गुरुवार दि.29 रोजी विशेष बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती.या बैठकीला महायुतीचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभापतींचा व महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उपसभापतीवरील अविश्वास ठराव बारगाळला आहे. बैठकीचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून वाड्याचे उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांनी काम पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -