घरपालघरपुढील दोन दिवस विजांचा कडकडाट

पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट

Subscribe

अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांच्या कडून देण्यात आली आहे.

पालघर: पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वार्‍यासह ( ३० ते ४० किमी प्रति तास) तुरळक ठिकाणी जोरदार व सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान आकाश पूर्णपणे ढगाळ राहील व भात पीक वाढीसाठी समाधानकारक पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, मेघ गर्जना होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी अप्लिकेशन वापरुन आपली व आपल्या जनावरांची सुरक्षा करावी, अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांच्या कडून देण्यात आली आहे.

तसेच शेतकरी बांधवांनी फवारणीची कामे वार्‍याचा वेग कमी असतानाच करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करुन विक्री करावी. चिकू बागेतील किडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे व पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -