घरपालघरTruck Drivers Protest : वाहनचालकांकडून पालघरमध्ये चक्काजाम; संपामुळे इंधनटंचाई

Truck Drivers Protest : वाहनचालकांकडून पालघरमध्ये चक्काजाम; संपामुळे इंधनटंचाई

Subscribe

केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे. या नवीन कायद्यानुसार हिट अँड रनमध्ये वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व लाखो रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

पालघर : नवीन वाहक कायद्यातील हिट अँड रनच्या शिक्षेविरोधात ट्रक-टँकर चालक संपावर गेले आहेत. या संपाचे पडसाद पालघर जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसशी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वसईच्या हद्दीत चक्काजाम केला होता. यानतंर आज हायवेवरील बोईसरजवळील चिल्हार फाटा येथे चक्काजाम करण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती. संपामुळे इंधनाची टंचाई निर्माण होऊ लागली लागली असून पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर पेट्रोल, डिझेल संपल्याने एकेक पेट्रोल पंप बंद होऊ लागले आहेत. त्याचबरोबर सीएनजी संपू लागल्याने सीएनजी पंप एकापाठोपाठ एक बंद होऊ लागले आहेत.

नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी सोमवारी (1 जानेवारी) दुपारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर वसईच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे हायवेवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आज सकाळी बोईसरजवळील चिल्हार फाटा येथे वाहनचालकांनी हायवे रोको आंदोलने केले. त्यामुळे हायवेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हायवेवर वसईच्या हद्दीत आज सकाळपासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Transport strike : असे राक्षसी कायदे करण्यात आले तर…, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

हिट अँड रनशिक्षेविरोधात ट्रक-टँकर चालक

केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे. या नवीन कायद्यानुसार हिट अँड रनमध्ये वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व लाखो रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे. त्यावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालकांचे आंदोलन सुरूच आहे. आज पालघर जिल्ह्यातील चिल्हार फाटा येथे ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केल्याचा फटका मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूकीला बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “आता काँग्रेसही फुटणार…”, सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांचा खळबळजनक दावा

पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम मालवाहतूकीस इतर वाहतुकीवर होऊ लागला आहे. यासंपामुळे इंधनाच्या गाड्या शहरात येतील की नाही या भीतीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्रीपासूनच वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. पालघर शहरातील एक पेट्रोल इंधन संपल्याने मंगळवारी दुपारीच बंद करण्यात आल्याने वाहनचालकांचे हाल होऊ लागले आहेत. हायवेवरील आता सीएनजी संपू लागल्याने सीएनजी पंपावरही मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत.

दरम्यान, ट्रक चालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हायवेवर ठिकठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच पेट्रोलची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पेट्रोल पंपांवरही पोलीस नजर ठेऊन आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -