घरपालघरकुडूसच्या सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

कुडूसच्या सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

Subscribe

या नोटीसाचा आधार घेत तक्रारदार यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमाखाली अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्याअनुषंगाने २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवली आहे.

वाडा:  तालुक्यातील महत्वाची समजली जाणार्‍या व मिनी नगरपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुडूस या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कोंगील,सदस्य नारायण मराड व सोनी बरफ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सन २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्च मुदतीत सादर न केल्याने त्यांच्या विरोधात तहसीलदार वाडा यांनी नोटीस बजावली होती. या नोटीसाचा आधार घेत तक्रारदार यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमाखाली अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्याअनुषंगाने २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवली आहे.

कुडूस ही ग्रामपंचायत तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कोंगील, सदस्य नारायण मराड, सोनी बरफ या विद्यमान पदाधिका-यांनी सन २०१६ रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती.या निवडणुकीनंतर त्यांनी एका महिन्यात निवडणूक खर्च सादर करणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांनी खर्च सादर केला नसल्याने वाडा तहसीलदार यांनी नोटीस काढली होती. या नोटीसाचा आधार घेत तक्रारदार इरफान सुसे यांनी सरपंचासह दोन सदस्यांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलमाखाली अपात्रेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्याअनुषंगाने सरपंचासह सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणे कामी 2 मे 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी पालघर येथे सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, अलीकडेच म्हणजे गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी 2016 मध्ये उमेदवार असलेल्यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने त्याच वेळी त्यांना प्रशासनाने बाद केले होते. यावेळी तालुक्यातील शेकडो उमेदवार बाद झाले होते. मग त्यावेळी जिल्हा प्रशासनाने या पदाधिकार्‍यांची नावे बाद केलेल्या यादीत का दिली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात असून या प्रकाराला प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -