घरमुंबईआमदार कपिल पाटील यांच्याविरोधात आझाद मैदानात धरणे, खोट्या तक्रारी करुन बदनाम केल्याचा...

आमदार कपिल पाटील यांच्याविरोधात आझाद मैदानात धरणे, खोट्या तक्रारी करुन बदनाम केल्याचा जनार्दन जंगलेंचा आरोप

Subscribe

कपिल पाटील हे भ्रष्ट मार्गाने निधी लाटत असल्याचाही आरोप जंगले यांनी केला आहे. पाटील यांनी ज्या-ज्या ठिकाणी खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

Protest against MLA Kapil Patil मुंबई – मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील आणि महामुंबई शिक्षण संस्था ही आपल्याविरोधात खोटे आरोप करुन त्रस्त करत असल्याचा आरोप शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे. कपिल पाटील यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे आणि शासन स्तरावर सुरु असलेला भ्रष्टाचारा रोखावा यासाठी शुक्रवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.

आमदार कपिल पाटील आणि महामुंबई शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हे आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप शिक्षक लोकशाही आघाडीचे (टीडीएफ) मुंबई अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे. जंगलेंचा आरोप आहे की, माझ्याविरोधात शिक्षणक्षेत्रात वातावरण निर्माण केले जात आहे. खून, खंडणी मागणे, असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. केवळ पोलिस स्टेशनच नाही तर, राज्यपाल, हायकोर्ट, केंद्र सरकारचे विविध विभाग, मुख्यमंत्र्यांसह विविध विभागात, धर्मदाय आयुक्तांकडेही तक्रारी केल्या आहे.

- Advertisement -

कपिल पाटील यांनी सर्व भ्रष्ट आमदारांना एकत्र करुन माझ्याविरोधात बदनामीचे सत्र उघडले आहे. तसेच विविध ठिकाणी तक्रारी देऊन बदनामी केली जात आहे, असा आरोप जंगले यांनी केला आहे.

कपिल पाटील हे भ्रष्ट मार्गाने निधी लाटत असल्याचाही आरोप जंगले यांनी केला आहे. पाटील यांनी ज्या-ज्या ठिकाणी खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही. त्यामुळे कपिल पाटील यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी जंगले यांनी आझाद मैदानातून केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -