घरपालघरWada News: जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप हंगाम पीक कर्ज वितरणास प्रारंभ

Wada News: जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप हंगाम पीक कर्ज वितरणास प्रारंभ

Subscribe

त्यानुसार चालू खरीप हंगामासाठी बागायती धान पिकासाठी प्रति एकरी२३,५०० जिरायती शेतीसाठी२०,५०० रुपये यानुसार वितरण होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे१००० रुपये आणि ३०० रुपये अशी प्रति एकरी वाढ करण्यात आलेली आहे.

वाडा : शेतीचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्या दृष्टीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सन २०२४ -२०२५ या खरीप हंगामा करता शेतकर्‍यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास २२ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला आहे.३१ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज वाटपाची मुदत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना खरीप हंगामा करता अल्पमुदतीचे बिनव्याजी कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दिले जाते.सन २०२३-२०२४ या हंगामात उचललेल्या पीक कर्जाची ३१ मार्च२०२४ पर्यंत परतफेड करावी लागते. त्यानंतर नवीन हंगामा करता१ एप्रिल पासून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी निवडणूक कालावधी असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २२ एप्रिल पासून शेतकर्‍यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे.३१ ऑगस्टपर्यंत वाटप होणार आहे. चालू हंगामासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने अल्पमुदतीचे कर्जाचे पीकनिहाय कर्ज दरात वाढ करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार चालू खरीप हंगामासाठी बागायती धान पिकासाठी प्रति एकरी२३,५०० जिरायती शेतीसाठी२०,५०० रुपये यानुसार वितरण होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे१००० रुपये आणि ३०० रुपये अशी प्रति एकरी वाढ करण्यात आलेली आहे.

७/१२ साठी तलाठी कार्यालयामध्ये गर्दी
नवीन हंगामा करिता कर्ज मिळण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालयामध्ये सातबारा मिळवण्यासाठी चकरा मारत आहेत. परंतु निवडणुकांमुळे तलाठी व्यस्त असल्याने शेतकर्‍यांना अद्यापही सातबाराचे वाटप करण्यात आलेले नव्हते. यांची एकच गर्दी केल्ल्याचे चित्र कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.

- Advertisement -

शेतकरी कर्जदारांना अल्पमुदतीचे पीक कर्ज मध्यवर्ती बँकेकडून वाटपास सुरुवात झालेली आहे. मात्र, कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले नाही.
– भावेश पाटील, शाखा व्यवस्थापक ,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा कुडूस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -