घरक्रीडाAshes Series AUS vs ENG 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का कमिन्स...

Ashes Series AUS vs ENG 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का कमिन्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर; स्मिथकडे कर्णधारपद

Subscribe

सध्या इंग्ंलड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे

सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. दरम्यान मालिकेतील दुसऱ्या सामन्याला एडिलेडवर गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र कांगारूच्या संघाला सामन्याच्या पूर्वसंध्येलाच जबरदस्त धक्का बसला आहे. कारण कर्णधार पॅट कमिन्स ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार नाही. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तर पहिल्या कसोटी सामन्यात १५४ धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

पॅट कमिन्स बुधवारी सायंकाळी एडिलेडमधील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता तिथे तो कोविड बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला. कमिन्सने लगेचच हॉटेल सोडले आणि कोविड-१९ ची चाचणी केली. आरटीपीसीआर चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ७ दिवस बायो-बबलमध्ये राहावे लागणार आहे. बॉक्सिंग दिवशी असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कमिन्स संघात सामील होईल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्याच हॉटेलमध्ये मिचेल स्टार्क आणि नाथन लायन देखील उपस्थित होते, परंतु ते वेगळ्या बाहेरच्या टेबलवर बसले होते. यामुळे दोन्ही खेळाडू दुसरी कसोटी खेळत आहेत. दुसरीकडे, २०१८ मध्ये केपटाऊन कसोटीनंतर स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकेल नेसर एडिलेड कसोटीत पदार्पण करणार आहे. या खेळाडूने गेल्या आठवड्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सात बळी घेतले होते. दरम्यान जोश हेजलवुड या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. त्याच्या जागी झाय रिचर्डसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, जॅक लीच, डेव्हिड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स.

- Advertisement -

हे ही वाचा :  http://Virat Vs Sourav Controversy: एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित करा, कपिल देव यांचा सल्ला


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -