शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे (Balasaheb Thackeray Birth Anniversary). यानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मोठ्या उत्साहाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसैनिक साजरे करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने आज सकाळपासून मुंबईतील दादर शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीटद्वारे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.
Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत नेतेमंडळींचे अभिवादन
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -