घरताज्या घडामोडीGo First Airlines ची प्रजासत्ताक दिनानिमित्त भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात...

Go First Airlines ची प्रजासत्ताक दिनानिमित्त भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात देशात कुठेही करा प्रवास

Subscribe

होळी आणि दिवाळी प्रमाणेच प्रजासत्ताक दिवस सुद्धा अनेक कंपन्यांसाठी सेल इव्हेंट झालंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त गो फर्स्ट एअरलाईन्स कंपनीकडून भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कंपन्यांनी आपल्या विक्रीत वाढ करण्यासाठी ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर देतात. मार्केटींगच्या जगात वैमानिक कंपन्या सुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे नाहीयेत.

प्रायव्हेट एॅविएशन कंपनी गो फर्स्ट जास्तीत जास्त ग्राहकांना देशांतर्गत होणाऱ्या प्रवासासाठी एक भन्नाट ऑफर देऊ करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिवशी Right to Fly या नावाने ही ऑफर दिली जात आहे. या फ्लाईटमुळे ग्राहकांना सर्वात स्वस्त पैशांत देशांतर्गत कुठेही फिरण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

काय आहे गो फर्स्टची ऑफर ?

गो फर्स्ट एअरलाईन प्रजासत्ताक दिनानिमित्त एक भन्नाट ऑफर ग्राहकांना देत आहे. फक्त ९२६ रूपयांत देशात कुठेही फिरण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर लवकरात लवकर मिळवण्यासाठी ग्राहकांना २२ जानेवारी ते २६ जानेवारी या ५ दिवसांच्या आत तिकीट बुकिंग करावी लागेल. तसेच याच दिवसांमध्ये ग्राहक ११ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंतची तिकीट बुकींग करू शकता. तसेच प्रवास करते वेळी तुम्ही १५ किलोपर्यंतचं सामान घेऊन जाऊ शकता.

- Advertisement -

फक्त देशांतर्गत तिकिटांवर सवलत

GoFirstने दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाची ऑफर फक्त देशांतर्गत तिकिटांवर उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणतीही सूट नाही. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटसह कुठूनही तिकीट बुक केल्यास तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

ग्राहकांनी गो फर्स्ट एअरलाइनच्या प्रजासत्ताक दिन ऑफर अंतर्गत तिकिटं बुक केल्यास तुम्ही प्रवासाच्या तीन दिवस आधी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमची तिकिटं शेड्यूल करू शकता. जर तुम्हाला तिकीट रद्द करायचे असेल तर तुम्हाला कॅन्सलेशन चार्ज भरावा लागणार आहे.


हेही वाचा : Weather Forecast : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -