कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आता ऑक्सिजनची उणीव भासू लागली आहे. घाटकोपर येथील एच जे दोषी म्हणजेच हिंदुसभा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या रुग्णालयात साडेसहा वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा होता. प्रशासन ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगत होते, पण ऑक्सिजन मिळत नव्हते, संध्याकाळचे साडेसहा वाजपर्यंत पुरवठा झाला नसता तर ६० रुग्णांनाचा जीव धोक्यात आले असते. पण म्हणतात ना दैव बलवत्तर आणि सव्वा सहा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन येणारा टेम्पो आला. रुग्णालया प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. टेम्पो येताच डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
Photo: वेळेत ऑक्सिजन पुरवठा झाल्याने घाटकोपर रुग्णालयातील अनर्थ टळला
written By Deepak Salvi
Ghatkopar
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -