घरफोटोगॅलरीPHOTO : आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी

PHOTO : आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी

Subscribe

जयपूर : आयपीएल 2024मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या 38व्या सामन्यात युजवेंद्र चहलने इतिहास रचला. या सामन्यातील पहिल्याच षटकात मोहम्मद नबीला बाद करून त्याने 200वी विकेट घेतली. आयपीएलच्या इतिहासात दोनशे विकेट घेणारा चहल हा पहिला गोलंदाज ठरला.

- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात 200वी विकेट घेण्याबरोबरच चहल हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला आहे.

- Advertisement -

चहलने आयपीएल 2013मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 153 सामने खेळले आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर चहलने 200 बळी घेतले आहेत.

सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चहलपाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचे नाव येते. त्याने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये 50 विकेट्स पूर्ण करणारा आरपी सिंग पहिला होता.

तर, 100 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. 150 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -