घरफोटोगॅलरीसरकारविरोधात मविआच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

सरकारविरोधात मविआच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

Subscribe

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप, महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय.. अशी घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत मविआ आमदारांनी घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -