Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : 'इंडिया'ची संयुक्त पत्रकार परिषद; सर्व नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

Photo : ‘इंडिया’ची संयुक्त पत्रकार परिषद; सर्व नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

“जुडेगा भारत… जितेगा इंडिया”चा नारा देत देशातील 28 पक्षांचे 63 प्रमुख नेते मुंबईत उपस्थितीत आले होते. इंडियाची ही दोन दिवसीय बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेल असलेल्या ग्रँड हयातमध्ये पार पडली. या बैठकीत इंडियाची पुढच्या रणनिती ठरवण्यात आली आहे. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आदी नेत्यांनी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -