माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते.
‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.
‘महेंद्रगिरी’ हे नाव ओडिशा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे, प्रकल्प 17A फ्रिगेट्स श्रेणीतील ही सातवी युद्धनौका आहे.
‘महेंद्रगिरी’ युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) ची फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती असून, यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत.
‘महेंद्रगिरी’ च्या बांधणीची पायाभरणी 28 जून 2022 रोजी करण्यात आली होती, आणि ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्यक्ष कामगिरीसाठी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अंदाजे 3450 टन वजनाचे हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल.
- Advertisement -
यावेळी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली 75 टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. ‘महेंद्रगिरी’ या प्रोजेक्ट 17 ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा योग्य दाखला आहे.
पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा पेठ गणपतीचे विसर्जन
पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
अभिनेते आदेश बांदेकर लालबाग राजाच्या मिरवणुकीत सहभागी
बाप्पाच्या विसर्जनला पावसाची हजेरी
मुंबई, नवी मुंबई, वसई...
भारताचा 66 धावांनी पराभव
तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया विजयी
मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
दादर रेल्वे स्थानकात फलाटाना सरसकट अनुक्रमे...
मकरंद पाठारे कुटुंबीयांनी बाप्पासाठी भारतीय नौदलचा देखावा साकरला आहे. ठाण्याच्या पाठारे कुटुंबीयांनी देखाव्यातून भारतीय नौदलाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाठारे कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती...