घररायगडरेश्मा शिंदेचे धाडस; माथेरान नगरपरिषदेच्या कारभारची केली पोलखोल

रेश्मा शिंदेचे धाडस; माथेरान नगरपरिषदेच्या कारभारची केली पोलखोल

Subscribe

माथेरान-: येथील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून, नगर परिषदेचे एकमेव असलेले बी.जे.रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेचा विषय (BJ Hospital is once again a topic of discussion) ठरले आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असल्याने नगर परिषदेच्या कारभारावरच रुग्णांच्या नातेवाईकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मूळ माथेरानच्या आणि महाबळेश्वर येथे स्थायिक असलेल्या रेश्मा शिंदे यांनी रुग्णालयाच्या दुरवस्थेची समाज माध्यमातून चित्रीकरणाद्वारे पोलखोल केली असून, त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

शिंदे आपल्या काकांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. काकांची तब्बेत नाजूक असल्याने त्यांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. एक रात्र आपल्या बहिणीसोबत काकांची देखभाल करण्यासाठी दवाखान्यात मुक्कामी असल्याने या ठिकाणी आलेल्या अनुभवाचे त्यांनी थेट चित्रीकरण करून समाजासमोर आणले आहे. रुग्णालयातील अतिशय विदारक चित्र आणि रुग्णांना असलेल्या तथाकथित सुविधांचा शिंदे यांनी पर्दाफाश केला आहे. त्यांनी निवडून गेलेल्या नगरसेवकांच्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करत प्रशासनावर देखील निशाणा साधला आहे. मात्र शिंदे यांना आलेला अनुभव इतर नागरिकही घेत असताना त्यांनी याबाबत मिठाची गुळणी का घेतली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी कोविडच्या काळात आईला या ठिकाणी उपचारासाठी ठेवले होते. त्यावेळी देखील परिस्थिती अशीच होती. आता तर त्याहून अधिक भयानक आहे. या ठिकाणी भिंतीवर धुळीचे साम्राज्य आहे. पंखे, कपाटे गंजलेली असून, जागोजाग जळमट तयार झाली आहेत. रुग्णालयातील चादरी, उशा अस्वच्छ असून, स्नानगृहासह शौचालयात पाण्याची धड व्यवस्था नाही. तर रुग्णांना गरम पाण्यासारखी सुविधाही मिळत नाही. त्याचबरोबर विद्युत उपकरणे बंद अवस्थेत असून, रुग्ण किंवा त्यांच्या सोबतच्यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-रेश्मा शिंदे, मूळ रा. माथेरान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -