घररायगडमहाडकरांनी अनुभवला किल्ले पाहिलेला माणूस, गो.नी.दांडेकर यांच्या जीवनावरील माहितीपटाचे सादरीकरण

महाडकरांनी अनुभवला किल्ले पाहिलेला माणूस, गो.नी.दांडेकर यांच्या जीवनावरील माहितीपटाचे सादरीकरण

Subscribe

गडप्रेमींना गड कसा पाहावा व कसा राखावा याबाबतचे मार्गदर्शन गोनीदांनी केले होते. त्यामुळे आज शेकडो तरुणांमध्ये त्यांनी दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण केली आहे. गड-किल्ले ही आपली स्फूर्तिस्थाने आहेत. त्यांचे जतन झाले पाहिजे. नवीन पिढीला दुर्गसंस्कार म्हणजे काय हे कळले पाहिजे.

डोंगर दर्‍यात वसलेले गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र मानून आपले संपूर्ण आयुष्य दुर्ग भ्रमंतीसाठी खर्च करणार्‍या गोनीदा म्हणजेच गो. नी. दांडेकर यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या किल्ले पाहिलेला माणूस या माहितीपटाचा अनुभव महाड व परिसरातील रसिकांनी मनमुराद घेतला. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील ३० हून अधिक ठिकाणी हा माहितीपट दाखवण्यात आला.

महाड येथील श्री विरेश्वर मंदिर सभागृहामध्ये ३ मार्च रोजी माहितीपटाचे आयोजन करण्यात आले. दी अण्णासाहेब को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष शोभा सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था, महाड व रायगड गिर्यारोहण संस्था यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सह्याद्री मित्रचे डॉ. राहुल वारंगे, शलाका वारंगे. अमोल वारंगे, सुधीर शेठ व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुर्ग भ्रमंतीकार व प्रसिद्ध कादंबरीकार गो. नि. दांडेकर यांनी आपल्या जीवनामध्ये अडीचशेहून अधिक किल्ले पाहिले आहेत. भटकंतीमधून किल्ले कसे पहावेत. दुर्ग भ्रमणगाथा, दुर्ग दर्शन याविषयीची विविध माहिती त्यांच्या पुस्तकातून मिळत असते.

- Advertisement -

गडप्रेमींना गड कसा पाहावा व कसा राखावा याबाबतचे मार्गदर्शन गोनीदांनी केले होते. त्यामुळे आज शेकडो तरुणांमध्ये त्यांनी दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण केली आहे. गड-किल्ले ही आपली स्फूर्तिस्थाने आहेत. त्यांचे जतन झाले पाहिजे. नवीन पिढीला दुर्गसंस्कार म्हणजे काय हे कळले पाहिजे. गोनीदांच्या शिवप्रेमाचा, कार्याचा, विचारांचा सर्वांना परिचय व्हावा, यासाठी या महितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या महाडमधील नागरिकांनी या माहितीपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वडके, व मनीषा शेंडे, प्रास्ताविक डॉ राहुल वारंगे व कार्यक्रमाचा शेवट राकेश मेहता यांचा कविता वाचनाने झाला.

साहित्य रचना, जीवन प्रवास उलगडणार
आद्य भटके म्हणून असलेली ओळख गोनीदांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत जपली. त्याच पावलांवर पाऊल ठेऊन पुढे असंख्य पावले गड किल्ल्याची वाट धरू लागली आहेत. त्यांचे शिवाजी महाराज व दुर्गांप्रती असलेले प्रेम पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहावे यासाठी या माहितीपटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. गोनीदांचा जीवन प्रवास, त्यांची साहित्य रचना, फोटोग्राफी व संगीताची त्यांना असणारी आवड, विविध मुलाखती, दिग्गजांसोबत केलेले गड दर्शन अशा सर्व प्रकारच्या माहितीचा ऊहापोह या माहितीपटात करण्यात आला आहे. या माहितीपटाचे लेखन दिग्दर्शन मिलिंद भानगे यांनी केले आहे. अभिनेता सुबोध भावे व गोनीदांची नात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या सुश्राव्य आवाजातील निवेदनामुळे माहितीपटाची रंगत वाढत जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -