घररायगडपेणमधील धरणांची पातळी खालावली; आंबेघर धरणातील पाण्याचा पिण्यासाठी वापरच नाही

पेणमधील धरणांची पातळी खालावली; आंबेघर धरणातील पाण्याचा पिण्यासाठी वापरच नाही

Subscribe

सध्या एप्रिल महिन्यातील अति उष्म्याने सार्‍यांनाच कमालिचे त्रस्त केले असून उष्माघाताने जिवीत हानी घडण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यातच अनेक ठिकाणच्या धरणे आणिजलाशयांतील पाणी पातळी घटू लागल्याने पाणी कपात, पाणी टंचाई सुरु आहे. तालुक्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नसून धरणांमधील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. खारेपाट भाग तसेच अनेक आदिवासी वाड्यांवर पाणी टंचाई सुरु आहे. विशेष म्हणजे पाणी टंचाई असतानाच दुसरीकडे धरणात पाणी साठा भरपूर पण तो पिण्यासाठी वापरलाच जात नाही अशी देखील परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे.आंबेघर धरणातील पाण्याचा वापर होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

मितेश जाधव : पेण
सध्या एप्रिल महिन्यातील अति उष्म्याने सार्‍यांनाच कमालिचे त्रस्त केले असून उष्माघाताने जिवीत हानी घडण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यातच अनेक ठिकाणच्या धरणे आणिजलाशयांतील पाणी पातळी घटू लागल्याने पाणी कपात, पाणी टंचाई सुरु आहे. तालुक्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नसून धरणांमधील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. खारेपाट भाग तसेच अनेक आदिवासी वाड्यांवर पाणी टंचाई सुरु आहे. विशेष म्हणजे पाणी टंचाई असतानाच दुसरीकडे धरणात पाणी साठा भरपूर पण तो पिण्यासाठी वापरलाच जात नाही अशी देखील परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे.आंबेघर धरणातील पाण्याचा वापर होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
तालुक्याला हेटवणे, आंबेघर आणि शहापाडा अशी एकूुण तीन धरणे लाभली आहेत. मध्यम प्रकल्प कामार्ली अखत्यारीत असणार्‍या सर्वात मोठ्या हेटवणे धरणाची क्षमता १४७.४९८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. ती आता ५४ दशलक्ष घनमीटरवर येऊन पोहोचली आहे.ग्रामीण पाणीपुरवठाच्या अखत्यारीत असणार्‍या शहापाडा धरणाची क्षमता ३२.५० दशलक्ष घनमीटर एवढी आहे, ती पातळी आता ८ दशलक्ष घनमीटरवर पोहोचली आहे. पाटबंधारे उपविभाग कर्जत यांच्या अखत्यारीत असणार्‍या आंबेघर धरणाची क्षमता ही २.५५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या आंबेघर धरणात सद्यास्थितीला पुरेसे पाणी आहे. मात्र तरीही ते पिण्याच्या वापरासाठी घेतले जात नाही ही खेदाची बाब मानली जात आहे. तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी सिडको प्राधिकरणाने पाईपलाइनद्वारे नवी मुंबईसाठी नेले जाते. काही प्रमाणात जवळच असणार्‍या शहापाडा धरणात सोडून ते पाणी खारेपाट भागातील नागरिकांसाठी पुरवले जाते. शहापाडा धरणाचा विचार केला असता या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ तयार झाला असल्याने या धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे पावसाळ्यात साठवणूक केलेला पाणी हा मार्च महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतो. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गाळमुुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या ही गेली अनेक दशके सुटता सुटेना. तालुक्याला मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असे तीन धरण असूनही जनतेचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे धरण उशाशी पण कोरड घशाशी, असे चित्र आहे. हेटवणे धरण हे मातीचे मोठे धरण असून ते नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे झाले आहे. या धरणाचे पाणी सर्वप्रथम नवी मुंबई आणि त्यांनतर यावर अधिकार पेणकरांना प्राप्त झालेला आहे. या धरणाचे पाणी शहापाडा धरणात कालव्याद्वारे सोडून मग पुढे ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवला जातो. म्हणजेच शहापाडा आणि हेटवणे ही दोन धरणे जरी असली तरी दोन धरणांच्या सहाय्याने हे पाणी तालुक्याला पुरवले जाते.

पिण्याच्या पाण्याचे नियोजनच नाही
विशेष बाब म्हणजे आंबेघर हे तालुक्यात असणारे तिसरे धरण असून ते आजही ते जवळपास ७०ते ८० टक्के भरलेले आहे, मात्र त्यातील पाण्याचा वापर तालुक्यातील कोणत्याही भागात पिण्यासाठी केला जात नाही. एकीकडे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही म्हणून टाहो फोडला जातोय. तर दुसरीकडे धरण भरलेले आहे पण त्याचा पिण्यासाठी वापार केला जात नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजनच प्रशासनाकडून व्यवस्थितपणे केले जात नाही हे प्रकर्षाने जाणवते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

- Advertisement -

शहापाडा धरणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ साठत असल्याने धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत घट होत आहे. त्यामुळे शासन राबवत असणार्‍या गाळमुक्त धरण आणि गाळमुक्म=त शिवार ही योजना शहापाडा धरणासाठी राबवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.ही योजना राबविल्यास धरणामध्ये साठलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणाची मुळ साठवण क्षमता पूर्वस्थितीत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. सध्या शहापाडा धरणात पुढील पंधरा ते वीस दिवस पुरेल इतका साठा आहे. मात्र हेटवणे धरणाच्या माध्यमातून आलेले पाणी आम्ही पंपाद्वारे उचलत आहोत. पिण्याच्या पाण्याबाबत पुढील नियोजन चालू आहे.
– संजय राठोड,
अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -