घरक्रीडाओडिशा सरकारकडून भारतीय हॉकीला मोठी भेट; 'एवढ्या' कोटींच्या करारावर स्वाक्षरी

ओडिशा सरकारकडून भारतीय हॉकीला मोठी भेट; ‘एवढ्या’ कोटींच्या करारावर स्वाक्षरी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा (Indian Hockey Team) अधिकृत प्रायोजक म्हणून ओडिशा सरकारने करार आणखी 10 वर्षांसाठी वाढवला आहे. यानुसार आता 2033 पर्यंत ओडिशा सरकारने (Odisa Government) भारताच्या पुरुष आणि महिला कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही स्तरांवर हॉकी संघाचे प्रायोजकत्व सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांचे ओडिशा सरकार 2018 पासून प्रायोजक आहे. खर तर भारतीय हॉकीला पुनरुज्जीवित करण्यात ओडिशा सरकारचे मोठे योगदान आहे. जानेवारीमध्ये पार पडलेला शेवटचा हॉकी विश्वचषक ओडिशामध्ये पार पडला होता, मात्र भारतीय उपांत्य फेरीत न पोहचता दुसऱ्या फेरीतच बाहेर पडला होता.

- Advertisement -

यापूर्वी, ओडिशा सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनने 2018 ते 2023 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय हॉकी संघाशी प्रायोजक म्हणून करार केला होता. या कराराला मुदतवाढ देण्याची मागणी भारतीय हॉकीच्या अध्यक्षांनी केली होती. यानुसार ओडिशा सरकारच्या परवानगीने ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनने पुढील 10 वर्षांसाठी करार वाढवला आहे. हा करार जानेवारी 2033 पर्यंत झाला असून यामुळे हॉकी इंडियाला तब्बल ४३४.१२ कोटी रुपये मिळणार आहेत.

भारतीय हॉकी संघ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष संघाने 41 वर्षांनंतर देशासाठी पदक जिंकताना कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याचवेळी महिला संघानेही उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

दरम्यान, ओडिशातील तरुणांमध्ये हॉकी खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे सरकारला या शहरात भारतीय हॉकीचे पुनरुज्जीवन करायचे आहे. याशिवाय तरुणांना हॉकीमध्ये करिअर करण्यासाठी एक चांगला पर्यायही उपलब्ध होणार आहे. यामुळे राज्यातील पर्यटनालाही चालना मिळणार असून जगभरातील हॉकीप्रेमी या राज्याला भेट देतील असा विश्वास सरकारला आहे.

भारत प्रथमच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार
तामिळनाडूच्या चेन्नई शहरात 3 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या सातव्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणारे चेन्नई हे पहिले भारतीय शहर असेल. अलीकडच्या काळात भारतातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ओडिशा ही पहिली पसंती होती. ओडिशाने 2018 आणि 2023 मध्ये पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करण्याव्यतिरिक्त FIH प्रो लीगचेही आयोजन केले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि पाकिस्तानसह सहा आशियाई देश सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -