घररायगडमोगल पराभवाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

मोगल पराभवाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यसाठी लढलेल्या लढाईपैकी उंबर खिंडीची लढाई खालापूर तालुक्यात चावणी येथे 2 फेब्रुवारी 1660 रोजी झाली होती.

मोगलांना पळता भुई थोडी करून बलाढ्य मोगल फौजेचा मूठभर मावळ्यांनी केलेल्या दारूण पराभवाच्या आठवणी मंगळवारी समरभूमी उंबर खिंडीत पुन्हा एकदा जाग्या झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यसाठी लढलेल्या लढाईपैकी उंबर खिंडीची लढाई खालापूर तालुक्यात चावणी येथे 2 फेब्रुवारी 1660 रोजी झाली होती. गनिमी तंत्राचा उत्तम नमुना दाखवत 30 हजारी मोगल सैन्याला मूठभर मावळे घेऊन मोगल सरदार कारतलब खानाला खिंडीत गाठून दाणादाण उडविणार्‍या संग्रामाची आठवण दरवर्षी या दिवशी विजय दिनाने साजरा केली जात. सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव चौक येथून उंबर खिंड मशाल रॅली काढली जाते. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे मशाल रॅली जरी रद्द झाली तरी शिवप्रेमींचा उत्साह कायम होता.

नेताजी पालकर यांच्या जन्मस्थान ठिकाणापासून चौक बाजारपेठेमधून रॅली मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत प्रांगणापर्यंत काढण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी, सिनियर ग्रुपचे अध्यक्ष संजय कोंडिलकर, उपाध्यक्ष सुरेश घाग, ज्येष्ठ नागरिक कृष्णा चंबावडे यांनी मशाल रॅलीत सहभाग नोंदवला होता. चावणी ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विजय दिन समरभूमी उंबर खिंड येथे साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी विजयस्तंभाला वंदन केल्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली.

- Advertisement -

लोणावळ्यासह विविध भागातून आलेल्या शिवप्रेमींनी लाठीकाठीसह सादर केलेल्या मर्दानी खेळानी उपस्थितांची वाहवा मिळवली. रायगड भूषण वैभव घरत आणि विवेक भोपी यांनी सादर केलेल्या पोवड्यांनी शिवप्रेमींची मने जिंकली. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ घोषणेने उंबर खिंड परिसर दुमदुमून गेला होता. शेकडो शिवप्रेमी विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी उंबर खिंडीत आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -