घरपालघरवसई विरार महापालिकेत प्रशासकीय फेरबदल

वसई विरार महापालिकेत प्रशासकीय फेरबदल

Subscribe

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांना आणत आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांना आणत आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. तीन परिमंडळांची निर्मिती करीत नव्याने आलेल्या तीन उपायुक्तांकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर दोन अतिरिक्त आयुक्तांकडे विषय समित्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अकरा वर्षात पदार्पण करीत असलेल्या वसई विरार महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. आयुक्त गंगाथरन डी. यांनी जून महिन्यात प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांची दोन्ही पदे भरली. त्यानंतर उपायुक्त मिळावेत यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सध्या महापालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्तांची नऊही रिक्त पदे भरली गेली आहेत.

उपायुक्तांच्या सर्व जागा भरल्यानंतर कामकाजाचे विक्रेंदीकरण करीत आयुक्तांनी तीन परिमंडळे स्थापन केली आहेत. परिमंडळ एकचा कार्यभार नव्याने शासनाकडून आलेल्या नयना ससाणे यांच्याकडे देण्यात आला असून या परिमंडळात प्रभाग समिती बोळींज, चंदनसार, विरार पूर्वेचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग समिती नालासोपारा पूर्व, नालासोपारा पश्चिम, पेल्हार प्रभागांचा परिमंडळ दोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या परिमंडळाची जबाबदारी शासनाकडून नव्याने आलेले उपायुक्त प्रकाश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वालीव, नवघर-माणिकपूर, वसई प्रभागांचा परिमंडळ तीनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या परिमंडळाची जबाबदारी शासनाकडून आलेल्या तानाजी नरळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्त चारुशिला पंडित यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागासह अपंग-दिव्यांग, समाजकल्याण, फेरीवाला धोरण, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, वृक्ष अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

महापालिकेला शासनाकडून अठरा सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत. त्यापैकी सध्या पाचच सहाय्यक आयुक्त दाखल झाले आहेत. प्रभाग समित्यांचा कार्यभार शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांकडे दिला जातो. पण, गेली अनेक वर्षे यापदावर अधिकारीच येत नसल्याने लिपीकांना प्रभारी सहाय्यक आयुक्त बनवण्याची प्रथा रुढ झाली होती. ती खंडीत करण्याचे काम आयुक्त गंगाथरन यांनी हाती घेतले आहे. पाच सहाय्यक आयुक्तांपैकी चार जणांकडे प्रभाग समित्या देण्यात आल्या आहेत. तर आस्थापना या महत्वाच्या विभागालाही शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त देण्यात आला आहे. अद्याप तेरा सहाय्यक आयुक्त दाखल होणार असून टप्याटप्याने सर्व प्रभाग समित्यांसह विभाग प्रमुखपदांवर शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांची वर्णी लावण्याचे आयुक्तांचे प्रयत्न आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -