घरराजकारणNeelam Gorhe : शिवसैनिक संभ्रमात, मात्र एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढील काळात...;...

Neelam Gorhe : शिवसैनिक संभ्रमात, मात्र एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढील काळात…; नीलम गोऱ्हेंना विश्वास 

Subscribe

मुंबई : विरोधकांनी आक्रमकपणे गैरसमज पसरवणारे मांडलेले मुद्दे व प्रसार माध्यमांनी भाजपाविरोधी मांडलेली गणिते यावर गैरसमज करून न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील मतदारांनी मतदान केले. या निवडणूक निकालावरून भारतीय जनता पक्षच सर्वसामान्य जनतेसाठी एक व्यवस्था निर्माण करतो आहे, हे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदान केले, हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही हेच यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. (Shiv Sainik in confusion but Eknath Shindes leadership in the future and enter shiv sena Belief in Neelam Gorhe)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमास नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, 50 आमदार व 13 खासदार शिवसेनेच्या भूमिकेला चिकटून राहून पक्ष नेतृत्वाला बाजूला करतात व बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले शिवशाहीच सरकार हाती घेतात! तेव्हा या सर्वांनी साथ का सोडली याचा विचार न करता रोज सकाळी उठून टिका करण्याला अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Balasaheb Thorat : 3 राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये फुटीचे वातावरण? बाळासाहेब थोरात म्हणतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये सहभागी होताना बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या विचारांना शिवशाहीची ध्येय, धोरण सुरू ठेवणाऱ्या नेतृत्वाला सहकार्य करण्यासाठीच साथ देत बाळासाहेबांच्या विचारांची मूळ शिवसेना त्यांनी आणखी मजबूत केली, पक्षाची भूमिका पक्षाचे चिन्ह अबाधित ठेवले, याचा आपल्याला अभिमान आहे, म्हणूनच आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यासाठी या प्रवाहात सामील झाली. 2002 पासून मी शिवसेनेची आमदार असून बाळासाहेबांचे विचार व शिवसेनेची भूमिका व त्यांना अभिप्रेत असलेले सरकार चालविण्यासाठी आपण शिंदे सरकारमध्ये सहभागी झालो व मूळ शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

- Advertisement -

खरं तर झापड बांधलेले व चकवा मारलेले नेतृत्व बाळासाहेबांचे विचार सोडतात, तेव्हा एकनाथ शिंदेंसारखे नेतृत्व बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात त्या नेतृत्वाला समर्थन करणे ही माझी जबाबदारी समजते, बाळासाहेबांचे विचार जपणारे व त्यांना आदर्श मानणारे शिवसैनिक व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चुकीच्या नेतृत्वामुळे पक्ष सोडून बाजूला गेले व दुसऱ्या पक्षात यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत, अशी खंतही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा – Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगावे की…; युतीसंदर्भात नितेश राणेंचे आव्हान

सिंधुदुर्गातील व कोकणातील शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत या नेत्यांची आपला सततचा संपर्क आहे. शिवसेनेच्या सभासद नोंदणीचे अभियानही लवकरच हाती घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सरकार चालवताना अनेक योजना राज्यात हाती घेतल्या. महिलांना प्राधान्यक्रम देताना एसटीमध्ये 50 टक्के सवलत जाहीर करत मोठा सन्मान दिला आहे. ‘लेक लाडकी’ यासारख्या महिलांच्या विविध योजना राबवून शिंदे सरकारने महिलांमध्ये व जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. शिवसेनेचे विचार शिवसेनेची भूमिका कायम ठेवली आहे. काही शिवसैनिक या राजकीय प्रवासामध्ये संभ्रमामध्ये असतीलही, पण ते खरे दुःखी आहेत असे मी मानते. मात्र बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व ते पुढच्या काळात मान्य करतील व या शिवसेनेत सहभागी होतील, असा विश्वासही नीलम ताई गोरे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करताना सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम फार मोठे आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काय हवे आहे, यासाठी राबविलेली व्यवस्था व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविलेल्या योजना यामुळेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील मतदारांनी भाजपाला चांगला कौल दिला. या नेतृत्वाने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून महिलांना फार मोठा सन्मान दिला आहे. 370 कलम रद्द केले, सर्व धर्म पंथाच्या महिलांना समान न्याय दिल्यामुळे व महिलांसाठी विविध योजना हाती घेतल्यामुळे महिलांचा सन्मान व त्यांच्या विकासाचा मार्ग निर्माण केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व शाश्वत विकास करू शकतो, असा विश्वास आता सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे. त्यामुळेच हे यश मिळू लागले आहे. महाराष्ट्र राज्यातही हेच सकारात्मक चित्र आगामी काळात दिसेल, असा विश्वास आहे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा – Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून गुंतवणूकदारांची 175 कोटींची फसवणूक

मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस, महिला विषयक गुन्हे अशा विषयावर 7 ते 20 डिसेंबर या काळात होणारे हिवाळी अधिवेशन लक्षवेधी ठरेल. या अधिवेशनात विक्रमी प्रश्नांवर चर्चा होईल व त्यावर चांगले निर्णय होतील. या अधिवेशनात विरोधकाने विरोधासाठी किंवा अधिवेशन चालू न देण्यासाठी विरोध करू नये. जर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर त्यावर चर्चा करावी वा अनेक प्रश्न मार्गी लावावेत. केवळ विरोधासाठी विरोध नको, असे आवाहनही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व डीनच्या मनमानी कारभाराविरोधात नीलम गोऱ्हे यांचे लक्ष वेधले असता, याबाबत येत्या अधिवेशनात चर्चा करुन आवश्यक त्या सूचना देऊन कार्यवाही करू अशी ग्वाही दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -