घररायगडउरणमधील जेएनपीटी मार्गाचे काम रामभरोसे

उरणमधील जेएनपीटी मार्गाचे काम रामभरोसे

Subscribe

येथील जेएनपीटीच्या ३ हजार कोटींच्या विस्तारित महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, मार्गाच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या नेतृत्त्वाखाली अधिकार्‍यांची एक फौज नेमलेली आहे.

येथील जेएनपीटीच्या ३ हजार कोटींच्या विस्तारित महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, मार्गाच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या नेतृत्त्वाखाली अधिकार्‍यांची एक फौज नेमलेली आहे. मात्र हे अधिकारी महामार्गाच्या निर्मिती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या मनाप्रमाणे आणि ठेकेदारांच्या निर्देशाने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ‘रोड व्हिजिट’च्या नावाखाली हे अधिकारी कार्यालयीन वेळेआधीच आपल्या घरचा रस्ता धरत असल्याने महामार्गाचे काम रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

जेएनपीटीच्या विस्तारिकरणामुळे वाहनांसाठी रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. बंदरात येणार्‍या अवजड वाहनांमुळे जेएनपीटी विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पर्यायाने जेएनपीटी व्यवस्थापनाने महामार्गाच्या आठपदरी रूंदीकरणाचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामध्ये रस्ता रूंदीकरण आणि उड्डाण पूल बांधण्यात येत आहेत. रस्ता रूंदीकरणाचे काम शेवटचा टप्प्यात आले असून, उड्डाण पूल निर्मितीही प्रगतीपथावर आहे.

- Advertisement -

या महामार्गाचे काम व्यवस्थित व्हावे म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ज्ञ अधिकार्‍यांचा चमू सज्ज केला आहे. त्यांच्यासाठी जेएनपीटी-पळस्पे-कळंबोली महामार्गावरील टी पॉइंटवर अद्यावत कार्यालयाची निर्मिती केली. मात्र या अधिकार्‍यांनी महामार्ग निर्मिती दरम्यान ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्या ऐवजी ठेकेदाराात्रनेच या अधिकार्‍यांना आपल्या मर्जीने नियंत्रित केल्याचे अजब दृश्य पहावयास मिळत आहे.
महामार्गाच्या निर्मितीवेळी रस्त्याची समपातळी नसून त्यावर अनेक वेडेवाकडे चढ-उतार असल्याचे दिसून येते.

ठेकेदाराच्या फायद्यासाठी महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर कट्स आणि क्रॉसिंग ठेवल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. रस्त्याच्या निर्मितीत भरावसाठी चिखल माती वापरल्याने नुकतीच द्रोणागिरी नोड परिसरात रस्ता खचून उड्डाण पुलाजवळच मोठे भगदाड पडले होते. याबाबत फेगडे यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत कबुली दिली होती. मात्र ठेकेदाराने कान चावताच रस्त्याला भगदाड नव्हे तर बारीक तडे गेल्याचे विधान फेगडे यांनी केले.
याबाबत आणि रस्त्याच्या एकूण दर्जाबद्दल विचारणा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत आणि काही पत्रकार प्राधिकरणाच्या कार्यालयात गेले असता फेगडे आणि अन्य अधिकारी पहाणीसाठी गेल्याचे तेथे उपस्थित कर्मचार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -