घररायगडउरण येथील जीडीएल कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड

उरण येथील जीडीएल कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड

Subscribe

गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) या कंपनीवर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी धाड टाकली. सुमारे १०० अधिकारी,कर्मचारी सुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रं आणि कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसून तपासणी करीत आहेत..या कंटेनर यार्डमधून सोने, अमली पदार्थ, रक्तचंदन आणि इतर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

उरण: सुभाष कडू
तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) या कंपनीवर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी धाड टाकली. सुमारे १०० अधिकारी,कर्मचारी सुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रं आणि कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसून तपासणी करीत आहेत.
जीडीएलया कंपनीतून कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते.या कंटेनर यार्डमधून सोने, अमली पदार्थ, रक्तचंदन आणि इतर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे हे कंटेनर यार्ड याआधीच डीआरआय, न्हावा -शेवा सीमा शुल्क, पोलिस यंत्रणेच्या रडारवर आहे.तस्करीच्या घटनांमुळे याआधीच सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपनीवर गुरुवारी सकाळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली आहे.

कंपनीचे गेट बंद
गुरुवारी सकाळी ११ वाजता गुप्तपणे टाकण्यात आलेल्या धाडीत सुरक्षा यंत्रणांसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. तपासणी दरम्यान अधिकार्‍यांनी कंपनीचे गेट बंद करण्यात आले. कर्मचारी, अधिकार्‍यांचे फोन स्वीच ऑफ ठेवण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे आतमधील कारवाईची खबरबात लागणे अशक्य होऊन बसले आहे.

- Advertisement -

पोलिसांनाही धाडले मागे
छाप्याची खबर मिळताच उरण पोलिसांनी इन्कमटॅक्स विभागाचे अधिकारी आणि कंपनीकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले.मात्र कारवाई गुप्त असल्याचे सांगत माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी माघारी धाडले असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.या कारवाई प्रकरणात इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांकडून काही अधिक माहिती मिळते काय, याची प्रतीक्षा असल्याचे न्हावा-शेवा बंदर विभागाचे पोलीस अधिकारी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -