घररायगड भंगार विक्रेत्याच्या गॅस सिलेंडरमुळे पनवेलमधील उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेला धोका

 भंगार विक्रेत्याच्या गॅस सिलेंडरमुळे पनवेलमधील उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेला धोका

Subscribe

मुंब्रा - पनवेल महामार्गावर खांदेश्वर आणि पनवेलला जोडणार्‍या हार्बर रेल्वे मार्गांवर रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. खांदा वसाहत आणि धाकटा खांदा गाव परिसरात आलेल्या या रेल्वे पूला खाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून, या जागेचा ताबा बेकायदेशीर पणे भंगार व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाने घेतला आहे.या विक्रेत्याने रेल्वे पूलाखालील जवळपास अर्धा भाग व्यापला असून हा व्यावसायिक या ठिकाणी भंगार साहित्यासोबत भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या गॅस कटर आणि गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी करत असल्याने उड्डाणंपूलाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.

 

दीपक घरत: पनवेल
मुंब्रा – पनवेल महामार्गावरील खांदा वसाहती जवळील उड्डाणपूलाला भंगार विक्रेत्याने विळखा घातला आहे. या ठिकाणी गॅस कटरच्या सहाय्याने वाहन कापण्याचे काम केले जात असल्याने उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेला तसेच स्फोट दुर्घटनेचा देखील धोका उत्पन्न झाला असतानाही पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या प्रकारामुळे भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल शेकाप तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी उपस्थित केला आहे.
मुंब्रा – पनवेल महामार्गावर खांदेश्वर आणि पनवेलला जोडणार्‍या हार्बर रेल्वे मार्गांवर रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. खांदा वसाहत आणि धाकटा खांदा गाव परिसरात आलेल्या या रेल्वे पूला खाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून, या जागेचा ताबा बेकायदेशीर पणे भंगार व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाने घेतला आहे.या विक्रेत्याने रेल्वे पूलाखालील जवळपास अर्धा भाग व्यापला असून हा व्यावसायिक या ठिकाणी भंगार साहित्याबत भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या गॅस कटर आणि गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी करत असल्याने उड्डाणंपूलाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे पूलाखालून जाणार्‍या रेल्वे रुळाना देखील धोका पोहचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तक्रार करूनही दुर्लक्ष
रेल्वे पुला खाली सुरु असलेल्या या व्यवसाया विरोधात शेकाप तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी पालिका अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. एक महिन्या पूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी नंतरही या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली नसल्याने पालिका अधिकारी आणि भंगार व्यावसायिक यांच्यात आर्थिक देवाण घेवाण तर झाली नाही ना असा संशय अडसूळे यांनी व्यक्त केला आहे.

अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत त्याच वेळी प्रभाग अधिकार्‍यांना या बाबत माहिती देण्यात आली होती. त्या नंतर संबंधित व्यवसायिकावर तात्काळ कारवाई करण्यात आली.
– कैलास गावडे,
उपाआयुक्त, पनवेल महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -