घरताज्या घडामोडीभाजपकडून ऑपरेशन लोटसची शक्यता; मुख्यमंत्री बघेल, राजीव शुक्ला हिमाचलला रवाना

भाजपकडून ऑपरेशन लोटसची शक्यता; मुख्यमंत्री बघेल, राजीव शुक्ला हिमाचलला रवाना

Subscribe

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. परंतु आतापर्यंतचे निकाल पाहता काँग्रेसने ३९ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपने २६ जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. परंतु यादरम्यान काँग्रेसला आता भाजपकडून ऑपरेशन लोटसची भिती वाटत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या विजयी आमदारांना हिमाचल प्रदेशमधून राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रसचे प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे शिमल्याला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

काँग्रेसला आपल्या आमदारांची घोडेबाजार होण्याची भिती आहे. परंतु हिमाचल प्रदेशात काँग्रेस विजयी झाल्यास जनतेच्या हिताची सर्व कामे करु, असे काँग्रेसचे दिग्गज नेते राजीव शुक्ला म्हणाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. हिमाचलमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला, असंही शुक्ला म्हणाले.

काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी सांगितले की, आतापर्यंतचे कल पाहता काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दुसरीकडे पाहिलं असता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या राजस्थानमध्ये पोहोचल्या आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांच्या सुरुवातीला कलांमध्ये काँग्रेस ३९ तर भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आप नावाच्या पार्टीचे १२ वाजले, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार; फडणवीसांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -