घररायगडरायगड जिल्ह्यात स्टार्टअपसह नाविन्यता यात्रेची सुरुवात

रायगड जिल्ह्यात स्टार्टअपसह नाविन्यता यात्रेची सुरुवात

Subscribe

कौशल्यप्रदर्शन करण्याची चांगली संधी 

म्हसळे:महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हसळे येथे स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रचार व प्रसिद्धीची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. यावेळी वृंदा कानल, प्रल्हाद घरत,स्वप्निल नारकर, राजेश पालकर, शुभम मोरे,सोहम नांदगांवकर, हरिश्चंद्र नाक्ती,जीवन कोटकर, यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे पी. एम. आढाव यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत रायगड जिल्ह्यात स्टार्टप आणि नाविन्यता यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक संस्था, लोकसमूह एकत्रीत होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी 17 ते 26 ऑगस्ट पर्यंत एक वाहन (मोबाईल व्हॅन) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरविण्यात येत असल्याचे आढाव यानी सांगितले. यावेळी नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांना नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्याबाबत माहिती देखील पूरविण्यात आली.

- Advertisement -

कौशल्यप्रदर्शन करण्याची चांगली संधी
ही यात्रा जिल्ह्यातील तळागळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, त्यांच्या नवसंकल्प नांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तंत्र मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, जिल्ह्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, असे वैशिष्टपूर्ण काम करणारआसल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या उमेदवारांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम केलेले आहे किंवा उपक्रम करण्यास इच्छुक आहेत, अशा उमेदवारांना त्यांचे कौशल्यप्रदर्शन करण्याची एक चांगली संधी यात्रेद्वारे मिळणार आहे. तरी याबाबत स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण सत्राचे तसेच सादरीकरण सत्राचे आयोजन दि. 15 व 16 सप्टेंबर 2022 असे दोन दिवस करण्यात येणार असून यावेळी गरजू उमेदवारांना तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उत्तमसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा – तालुकास्तरावरुन नोंदणी केलेल्या नव उद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्तम संकल्पना सादर करणार्‍यांना २५ हजार रुपयांचे पारितो षिक मिळणार आहे. राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना १ लक्ष रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -