घररायगडवरिष्ठांचे दुर्लक्ष! तळे येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

वरिष्ठांचे दुर्लक्ष! तळे येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

Subscribe

तळे-: तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा (Tale Thackeray gat leedar resignation) दिला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत हे राजीनामे देण्यात आले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक ग्रामपंचायत वगळता सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा फडकला आहे. भांनग या एकाच ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार वंदना दळवी या विजयी झाल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तालुक्यात सर्व ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार सरपंच पदी निवडून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.मात्र सारेकाही अलबेल असताना पक्षातील कुरखोडयामुळे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला आहे.हा राजीनामा पक्षातील काही प्रमुखांवर नाराजी असल्याने दिल्याचे बोलल जात आहे. या राजीनाम्यानंतरची रणनीती नक्की काय असेल, हे राजीनामे मंजूर होतील का, की इतर पक्षात या सर्वांचा प्रवेश होणार, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

  • कुणी दिला राजीनामा
    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख नाना दळवी, तालुका महिला आघाडी प्रमुख लता मुंढे, शहरप्रमुख नजीर पठाण, तालुका युवा अधिकारी नितीन साळवी, उप तालुकाप्रमुख भगवान शिंदे, विभागप्रमुख विजय कदम, दगडू ठसाळ, युवा प्रमुख आप्पाजी दळवी, शाखाप्रमुख जनार्दन मुंढे, सखाराम करण, सुरेश कदम, नथुराम चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -