घररायगडWhale Fish Died: 'त्या' बेबी व्हेलचा अखेर मृत्यू; 40 तासांची बचाव मोहीम...

Whale Fish Died: ‘त्या’ बेबी व्हेलचा अखेर मृत्यू; 40 तासांची बचाव मोहीम अयशस्वी

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे व्हेल माशाचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. तब्बल 40 तास या ठिकाणी बेबी व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले होते. परंतु हे प्रयत्न अपयशस्वी ठरले. त्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे व्हेल माशाचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. तब्बल 40 तास या ठिकाणी बेबी व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले होते. परंतु हे प्रयत्न अपयशस्वी ठरले. त्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला आहे. (Whale Fish Died That Baby Whale Finally Dies A 40 hour rescue mission failed)

मागच्या तीन दिवसांपासून बेबी व्हेलला खोल समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर, बुधवारी 15 नोव्हेंबरला व्हेलला पाण्यात सोडण्यात आलं. परंतु बेबी व्हेल संध्याकाळी पुन्हा किनाऱ्यावर आला आणि आता या व्हेल माशाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

- Advertisement -

40 तास सुरू होती बचाव मोहीम

सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा यावेळी माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडलं गेलं. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसंल. त्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन व्हेल सुरू करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारासा या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात आलं होतं, मात्र पुन्हा बेबी व्हेल समुद्र किनारी आला आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. अखेर त्या व्हेल माशाचा अंत झाला.

बेबी व्हेल मरण का पावला?

व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतात तेव्हा ते किनाऱ्यावर येऊ शकतात. किनाऱ्यावर आल्यावर ते त्यांच्या महाकाय शरीराचा भार पेलू शकत नाहीत त्यामुळे त्यांची इंद्रिये दबली जातात. त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उप्षणात निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात.

- Advertisement -

तसंच, साधारणपणे तीन वर्षे व्हेल माशाचं पिल्लू हे आईच्या दुधावर वाढतं. समुद्रात पर सोडल्यावरही या व्हेल माशाला त्याची आई भेटणं महत्त्वाचं होतं. बेबी व्हेल जन्माना आल्यानंतर लगेच दूध पि्ण्यास सुरूवात करतं. बेबी व्हेलमधील Natural Instinct आणि गंध ज्ञान यामुळे, आपल्या आईला दुधाची भूक लागल्यावर कुठे स्पर्श करायचा याचं त्यांना उपजतच ज्ञान असतं. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवतं आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारलं जातं. हे पाण्यामध्ये फवारलं गेलेलं दूध पिल्लू पितं.

(हेही वाचा: वरिष्ठांचे दुर्लक्ष! तळे येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -