घररायगडसोमवारपासून जिल्हा परिषदेच्या चाव्या प्रशासनाच्या हातात, निवडणुका पाच महिने लांबण्याची शक्यता

सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या चाव्या प्रशासनाच्या हातात, निवडणुका पाच महिने लांबण्याची शक्यता

Subscribe

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत होणार की, लांबणार याबाबत संभ्रम वाढला होता. तर मध्यंतरी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता.

रायगड जिल्हा परिषदेची मुदत २० मार्च रोजी संपत आहे. यामुळे सोमवार (ता. २१) पासून येथील कारभाराच्या चाव्या प्रशासनाच्या हातात जाणार आहेत. १३ मार्च २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी प्रशासनाने कारभार हातात घेतला आहे.ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्यावर रायगडमध्ये किमान निवडणुका लागण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागणार असून या दरम्यान कामकाजाची जबाबदारी प्रशासकांना संभाळावी लागणार आहे.

जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपताच जिल्हापरिषदेची सर्व सुत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे देण्यात आली आहेत. पंचायत समित्यांची सुत्रे गटविकास अधिकार्‍यांकडे दिली जाणार आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत होणार की, लांबणार याबाबत संभ्रम वाढला होता. तर मध्यंतरी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ओबीसी आरक्षणालाही स्थगिती आल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करुन ग्रामपंचायत, सहा नगरपंचायतींच्या निवडणुका घ्याव्या लागल्या. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत अद्याप न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. या सर्व गोंधळात आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षण, सुधारीत गण-गटाची रचनेला मान्यता मिळेपर्यंत काही कालावधी लागणार असल्याने हा वेळ लागणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका वेळेत होणार की, मुदतवाढ मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. आधी सरकार सर्व पक्षांचे मत जाणून घेऊन त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता या संस्थांच्या निवडणूका किमान पाच महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर या कालावधीसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

याच दरम्यान पाणीटंचाई, शाळा दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती अशी कामे पुर्ण होणे गरजेची आहेत. जरी जिल्हापरिषदेची मुदत संपलेली असली तरी ही कामे पुर्ण करुन घेण्यासाठी आगामी भावी सदस्य म्हणून प्रयत्न करणार.
– सुरेंद्र म्हात्रे,, विरोधी पक्षनेते, रायगड जिल्हा परिषद

- Advertisement -

विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी पुढील निवडणुका होईपर्यंत कारभार संभाळतील.
– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -