घरक्रीडाक्रिकेट सामन्यादरम्यान अफगाणिस्तामध्ये बॉम्बस्फोट, मैदानात उडाली खळबळ

क्रिकेट सामन्यादरम्यान अफगाणिस्तामध्ये बॉम्बस्फोट, मैदानात उडाली खळबळ

Subscribe

अफगाणिस्तानच्या काबूल येथे क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मैदानात एकच खळबळ उडाली आहे. काबूल येथे अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान मैदानातच हा स्फोट झाल्याचं कळतंय. या हल्ल्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून स्टेडियमवर हल्ला झाला तेव्हा तेथे संयुक्त राष्ट्राची एक व्यक्ती उपस्थित होती, जी मुलाखतीसाठी तेथे पोहोचली होती.

- Advertisement -

ही घटना बंद-ए-अमिर ड्रॅगन्स आणि पामिर झल्मी या संघामध्ये सामना सुरु असताना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१३ साली ही स्पर्धा सुरू केली होती. तसेच यंदाच्या वर्षात सुद्धा ही स्पर्धा सुरू आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली आहे. तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या इस्लामिक स्टेटने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेचा फटका अफगाणिस्तानला बसला आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी जूनमध्ये काबुलच्या बाग-ए बाला परिसरात गुरुद्वाराकर्ते परवानमध्ये अनेक स्फोट झाले होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. या स्फोटात शीख समुदायाच्या एका सदस्यासह दोन जणांचा मृत्यू देखील झाला होता.


हेही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; बॉक्सर शिव थापाची आक्रमक खेळी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -