घरक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; बॉक्सर शिव थापाची आक्रमक खेळी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; बॉक्सर शिव थापाची आक्रमक खेळी

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आनंदाची बातमी दिली आहे. भारताचा बॉक्सर शिव थापा (Shiv Thapa) याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला (Suleman Baloch) याला पराभूत केले आहे. शिव थापाने ५-० च्या फरकाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव करत ६३ किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आनंदाची बातमी दिली आहे. भारताचा बॉक्सर शिव थापा (Shiv Thapa) याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला (Suleman Baloch) याला पराभूत केले आहे. शिव थापाने ५-० च्या फरकाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव करत ६३ किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळांना सुरुवात झाली असून, सुरूवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळाला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताचा बॉक्सर शिव थापाने राऊंड ऑफ ३२ चा सामना पाकिस्तानच्या सुलेमान बलोच विरुद्ध खेळला. या सामन्यच्या सुरुवातीपासून शिवने आक्रमक खेळी केली. त्यामुळे सुलेमानला उलट मारा करणे कठीण जात होते. परिणामी थापाने सुलेमानला अधिक प्रतिवार न करु देता ५-० च्या फरकाने पराभूत केले.

- Advertisement -

दरम्यान, पहिल्या फेरीत शिव थापाने सुलेमानला एकही गुण कमावण्याची संधी दिली नाही. आक्रमण आणि बचाव याचा उत्तम समन्वय यावेळी शिवाच्या कामगिरीत पाहायला मिळाला. शिवाने सुरुवातीपासूनच आपली खेळी आक्रमक ठेवली होती. पहिल्या फेरीत दमदार कामगिरी करत शिवाने आघाडी घेतली होती.

दुसऱ्या फेरीत शिवाकडून पहिल्या फेरीपेक्षा जास्त चांगला खेळ पाहायला मिळाला. दुसऱ्या फेरीत सुलेमानला त्याने कोणतीच संधी दिली नाही. दुसऱ्या फेरीतही शिवाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्यामुळे शिवाला या सामन्यात सुलेमानवर ५-० असा दणदणीत विजय साकारता आला. सध्या शिवा अव्वल १६ जणांमध्ये दाखल झाला आहे.

- Advertisement -

टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्राने मुशफिकुह कलामचा ११-५ अशा फरकाने पराभव केला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिका बत्राने प्रतिस्पर्धी खेळाडू मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुह कलामला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन (Reeth Tennison) आणि श्रीजा अकुलानं (Sreeja Akula) दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स (Lailaa Edwards) आणि दानिशा पटेलला (Danisha Patel) पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली.


हेही वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -