घरक्रीडाTokyo Olympic 2020: सामन्यातील पराभवानंतर खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबियांना जातीवरून शिवीगाळ

Tokyo Olympic 2020: सामन्यातील पराभवानंतर खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबियांना जातीवरून शिवीगाळ

Subscribe

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर संघातील खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. वंदना कटारियाच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी वंदना कटारिया यांच्या भावाच्या तक्रारीवरून तपास केला जात असल्याचे हरिद्वारचे एसएसपी कृष्णराज एस यांनी सांगितले. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०४ आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

उपांत्यपूर्व फेरी जिंकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला, पण उपांत्य फेरीच्या सामन्यात हा संघ अर्जेंटिनाकडून पराभूत झाला. बुधवारी झालेल्या या सामन्यानंतर टीम इंडियाच्या पदरी निराशा आली, पण महिला संघाच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. दरम्यान, उत्तराखंडमधील वंदना कटारियाच्या भावाकडूनही पोलिसांना एक तक्रार मिळाली, ज्यामध्ये असे म्हटले की, उपांत्य फेरीत हरल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांसह तिला शिवीगाळ करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर पोलीस या प्रकरणी कारवाई करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय महिला हॉकी संघाची मागील ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये होती जेव्हा भारतीय महिला संघ सहा संघांपैकी चौथ्या स्थानावर होता. त्यानंतर महिला हॉकीने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आणि सामने राउंड-रॉबिनच्या आधारावर खेळले गेले, ज्यामध्ये अव्वल असणारे दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले. यावेळी टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल अशी अपेक्षा होती, पण उपांत्य फेरीतच पराभूत झाल्याने भारतीय संघ बाहेर पडला. आता संघाची कांस्यपदकावर नजर आहे.


Tokyo Olympics : पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक यशाला देशवासियांचा सलाम;

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -