घरCORONA UPDATEDelta Variant: खतरनाक डेल्टा व्हेरियंटचा १३५ देशांमध्ये विस्फोट, जागतिक संसर्गाचा आकडा २०...

Delta Variant: खतरनाक डेल्टा व्हेरियंटचा १३५ देशांमध्ये विस्फोट, जागतिक संसर्गाचा आकडा २० कोटी पार

Subscribe

कोरोना विषाणूचा सर्वाधिक संक्रमक डेल्टा व्हेरियंटने जगभरातील १३५ देशांमध्ये थैमान घातले आहे. यामुळे या देशांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यामुळे लवकरचं जागतिक कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत वाढ होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ३ ऑगस्ट रोजी साप्ताहिक प्रकाशनाच्यावेळी म्हटले की, जगभरातील १३२ देशांमध्ये बीटा व्हेरियंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरियंटची प्रकरणं आढळत आहेत. याचवेळी १८२ देशांमध्ये कोरोनाच्या अल्फा व्हेरियंटचे रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १३५ देशांमध्ये सर्वाधिक संसर्गजन्य डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या व्हेरियंटने संक्रमिक पहिला रुग्ण सर्वप्रथम भारतात आढळला.

WHO ने अहवालात म्हटले आहे की, जगभरात कोरोना रुग्णसंख्येचा ट्रेंड वाढताना दिसतोयं. गेल्या आठवड्यात २६ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान ४० लाखांहून अधिक कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, संसर्गाची जागतिक आकडेवारी सध्या २००,१५२,०५७ आहे. तर मृत्यूंची संख्या ४,२५५,४४३ झाली आहे. त्याचबरोबर जगभरात आतापर्यंत ४,२६५,५७४,६८२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून अमेरिका सर्वात वाईट स्थितीत आहे. या देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३५,३३१,६९९ झाला आहे, तर मृतांची संख्या ६१४८०३ झाली आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्गातच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत भारतात ३१, ७६९,१३२ प्रकरणे नोंदवण्यात आली. ३० लाखांहून अधिक कोरोना रुग्ण असणारे देश : ब्राझील (२०,०२६,५३३), रशिया (६,२७४,००६), फ्रान्स (६,२७०.९६१), ब्रिटन ५,९८०,८८७), तुर्की (५,८२२,४८७), अर्जेंटिना (४९७५६१६), कोलंबिया (४,८१५,०६३), स्पेन (४,५४४,५७६) इटली (४,३६९,९६४), इराण (४,०१९,०८४) जर्मनी (३,७८६,००३) आणि इंडोनेशिया (३,५३२,५६७).

कोरोना संसर्गामुळे मृतांच्या संख्येत ब्राझीलनंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. या देशात आतापर्यंत ५५९,६०७ बाधित लोकांचा येथे मृत्यू झाला आहे. भारत (४२५७५७), मेक्सिको (२४१,९३६), पेरू (१९६,६७३), रशिया (१५९,०३२), ब्रिटन (१३०,३००), इटली (१२८,१३६), कोलंबिया (१२१,६९५) फ्रान्स (११२,२१५) अर्जेंटिना (१०६,७४७) आणि इंडोनेशिया (१००,६३६) या देशांमध्ये एक लाखापेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

Delta Variant: जीवघेण्या डेल्टा व्हेरियंटची १३२ देशांमध्ये दहशत; २९ देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता – WHO


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -