घरक्रीडाजाधव गटाचे सर्व उमेदवार विजयी

जाधव गटाचे सर्व उमेदवार विजयी

Subscribe

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची ‘पंचवार्षिक निवडणूक’

मारुती जाधव गटाचे सर्व २५ उमेदवार मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या ‘पंचवार्षिक निवडणुकीत’ विजयी झाले. रविवारी वडाळा येथे झालेल्या या निवडणुकीत जाधव गटाने कृष्णा तोडणकर गटाचा पराभव करत सलग तिसर्‍यांदा विजय मिळवला. कृष्णा तोडणकर गटाला शिवसेना पक्षाचे पाठबळ लाभले होते. त्यामुळे हा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का होता.

जाधव गटाने २००९ साली झालेल्या निवडणुकीत राजाराम पवार गटाचा, तर २०१४ सालच्या निवडणुकीत अनिल घाटे गटाचा पराभव केला होता. जाधव गटाच्या मनोहर इंदुलकर आणि विश्वास मोरे यांनी या निवडणुकीत सर्वाधिक २८५ मते मिळवली. तोडणकर गटाकडून सचिन अहिर यांना २३० मते मिळाली. या निवडणुकीत ४९५ प्रतिनिधींपैकी ४८१ प्रतिनिधींनी मतदान केले. १६ मते बाद ठरली, तर ४६५ मते ग्राह्य धरण्यात आली.

- Advertisement -

उमेदवारांना मिळालेली मते-
विजेता जाधव गट : मनोहर इंदुलकर (२८५), विश्वास मोरे(२८५), शुभांगी पाटील (२७५), शरद कालंगण (२७४), भाई जगताप (२७२), मारुती जाधव (२७१), अनिल घाटे (२७१), रामचंद्र जाधव (२७०), सुशील ब्रीद (२६९), दिनेश पाटील (२६९), महेंद्र हळदणकर (२६८), नितीन कदम (२६६), विद्याधर घाडी (२६५), मिलिंद कोलते (२६५), चंद्रशेखर राणे (२६२), मनोहर साळवी (२६२), अनिल केशव (२६१), शिवकुमार लाड (२६०), भरत मुळे (२६०), संजय सूर्यवंशी (२६०), आनंदा शिंदे (२५९), शिवाजी बावडेकर (२५७), गो. नी. पारगावकर (२५१), राजामनी नाडार (२५१), नितीन विचारे (२४९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -