घरक्रीडाअमर हिंद शालेय खो-खो

अमर हिंद शालेय खो-खो

Subscribe

वितेश काटे आणि निखील पाडावे यांच्या अष्टपैलू खेळामुळे परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलने आय. ई. एस. न्यू इंग्लिश स्कूलचा ३ गुणांनी पराभव करत अमर हिंद मंडळ आयोजित आंतरशालेय मुलांच्या खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच, मुलींच्या सामन्यात सेक्रेट हार्ट स्कूलने शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेचा अवघ्या एका गुणाने पराभव केला.

दादर येथील अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर होत असलेल्या या स्पर्धेत डॉ. शिरोडकर हायस्कूलने आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूलचे कडवे आव्हान १३-१० असे परतवून लावले. डॉ. शिरोडकरकडून अष्टपैलू वितेश काटे (२:३०, १:५० मि. संरक्षण आणि २ गडी), निखील पाडावे (१:००, १:३० मि. संरक्षण आणि ६ गडी) यांनी दोन्ही पाळीत दमदार खेळ केला. तर, न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्वेश संगरे (१:३०, १:०० मि. संरक्षण आणि ३ गडी), अर्पित तिवारी (१:५० मि. संरक्षण आणि ४ गडी) यांनी चांगला खेळ केला. पण, त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

- Advertisement -

तसेच, मुलींमध्ये सेक्रेट हार्ट स्कूलने शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेवर अटीतटीच्या सामन्यात ४-३ अशी मात केली. या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघ २-२ अशी बरोबरी होती. पण, श्रुती पांडे (नाबाद २:३० मि. संरक्षण आणि १ गडी), काव्याक्षी सोनार (१:४०, नाबाद १:०० मि. संरक्षण) यांच्या अप्रतिम खेळामुळे सेक्रेट हार्ट स्कूलने या सामन्यात बाजी मारली. शारदाश्रम विद्यामंदिरकडून रुद्रा नाटेकर हिने नाबाद ३:४० आणि ३:३० मिनिटे संरक्षण करत चांगली झुंज दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -