घरक्रीडाAshes Series 2021 AUS vs ENG: पॅट कमिन्स बॉक्सिंग-डे कसोटीसाठी सज्ज; तयारीलाही...

Ashes Series 2021 AUS vs ENG: पॅट कमिन्स बॉक्सिंग-डे कसोटीसाठी सज्ज; तयारीलाही केली सुरूवात

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सध्या लोकप्रिय अशा ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सध्या लोकप्रिय अशा ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला होता. मात्र ॲडलेड सामन्यातून बाहेर गेलेला पॅट कमिन्स २६ तारखेला सुरू होणाऱ्या मेलबर्नमधील बॉक्सिंग कसोटी सामन्यात संघाचा भाग असणार आहे. कमिन्स आताच्या घडीला सिडनीमध्ये विलगीकरण कक्षात आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कमिन्स लवकरच ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत जोडला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने काही दिवसांपूर्वीच माजी विकेटकिपर फलंदाज टिम पेनच्या जागेवर पॅट कमिन्सला कसोटी संघाचा कर्णधार बनवले होते.

दरम्यान, कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघाचा ९ गडी राखून पराभव केला होता. कमिन्सने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ५ बळी पटकावले होते तर दुसऱ्या डावात २ बळी घेतले होते. मेलबर्नमध्ये कमिन्सच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.

- Advertisement -

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, कमिन्स आता सरावाला सुरूवात करू शकतो आणि तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याच्या फिटनेसवर पूर्णपणे काम करू शकतो. मात्र, अद्यापही कमिन्सला गर्दीच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध लावले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेल्यानंतर कमिन्स ॲडलेडहून सिडनीला रवाना झाला होता.

तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत उपकर्णधार स्टीव्ह स्मिथकडे संघाची कमान सोपवली आहे. स्मिथने त्याच्या कर्णधारपदात ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३४ मधील १८ कसोटी सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. मात्र २०१८ मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्याने एक वर्षासाठी त्याला क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले होते. तर स्मिथला दोन वर्षांपासून कर्णधारपदापासून देखील लांब ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

हे ही वाचा: http://IPL 2022 : २ वेळा IPL चॅम्पियन राहिलेल्या गंभीरचे लीगमध्ये पुनरागमन; लखनऊ फँचायझीने बनवला संघाचा मेंटॉर


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -