घरताज्या घडामोडीRohini court explosion : DRDO च्या वैज्ञानिकानेच कोर्टात ठेवला बॉम्ब, पोलिसही हादरले

Rohini court explosion : DRDO च्या वैज्ञानिकानेच कोर्टात ठेवला बॉम्ब, पोलिसही हादरले

Subscribe

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या रोहिणी कोर्टात एका छोट्या क्षमतेचा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाचे कारण शोधले असता एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO) च्या एका वैज्ञानिकाला या स्फोटाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याच महिन्यात ९ डिसेंबर कोर्ट रूम १०२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे एक व्यक्ती जखमी झाला होता. या स्फोटाशी संबधितच या वैज्ञानिकाला अटक झाली आहे.

DRDO चा वैज्ञानिक असलेल्या भारत भुषण कटारिया या व्यक्तीला या स्फोटकांशी संबंधित प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. कटारियाने एका जेवणाच्या डब्यात ही स्फोटके ठेवली. त्यानंतर हा डबा कोर्टरूममध्ये ठेवला. या वैज्ञानिकाचा शेजारी असलेली व्यक्ती ही वकील आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी सकाळी ९.३३ वाजताच कोर्टरूममध्ये पोहचला होता. त्याच्याकडे दोन बॅग होत्या. त्यापैकी एका बॅगेत स्फोटकांचा डबा होता. त्यापैकी स्फोटकांनी भरलेली बॅग या वैज्ञानिकाने कोर्ट रूममध्येच सोडली. त्यानंतर १०.३५ वाजता हा आरोपी कोर्टरूममधून बाहेर पडल्याची माहिती त्यांनी दिली.

कटारिया आणि त्यांच्या शेजाऱ्यात आधीच कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. केवळ वैयक्तिक रागापोटीच याआधीही दोघांमध्ये आधीही खटके उडाले असल्याची माहिती आहे. वकिलाविरोधातील वचपा काढण्यासाठीच हा प्रकार केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

Rohini Court Blast: दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट, दोन कर्मचारी जखमी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -