घरक्रीडाAsia Cup 2023 : पाकिस्तानचे आशिया चषकाचे स्वप्न भंगले, ICC च्या क्रमवारीतही...

Asia Cup 2023 : पाकिस्तानचे आशिया चषकाचे स्वप्न भंगले, ICC च्या क्रमवारीतही घसरण

Subscribe

आशिया चषकात श्रीलंका संघाकडून पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंकेकडून झालेल्या पराभवामुळे आयसीसी क्रमवारीत सुद्धा पाकिस्तानची घसरण झाली आहे.

नवी दिल्ली : आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. तर काल (ता. 14 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात श्रीलंका संघाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आला. त्यामुळे आता आशिया चषकातील अंतिम सामना हा भारत आणि श्रीलंका संघामध्ये होणार आहे. परंतु कालच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानच्या संघाला दोन मोठे धक्के मिळाले आहेत. पहिला धक्का म्हणजे या वर्षी सुद्धा त्यांना आशिया चषकाच्या अंतिम फेरीत जाता आले नाही. तर पाकिस्तानला बसलेला दुसरा हादरा म्हणजे आयसीसी क्रमवारीत सुद्धा पाकिस्तानची घसरण झाली आहे. (Asia Cup 2023 : Pakistan Asia Cup dream shattered, ICC rankings also fall)

हेही वाचा – Aditya-L1 Mission : ‘आदित्य’ने चौथ्यांदा बदलली कक्षा; सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे

- Advertisement -

भारत आणि श्रीलंका संघाकडून पाकिस्तानचा लागोपाठ दोन्ही सामन्यात पराभव झाला. ज्यामुळे पाकिस्तानला याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. लागोपाठ दोन्ही सामन्यात पराभव झाल्यामुळे आता आयसीसीच्या क्रमवारीत पाकिस्तान संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर आनंदाची बातमी म्हणजे भारतीय संघाने आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा पहिल्या स्थानावर आहे.

आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये काल झालेल्या सामन्यात श्रीलंका वि. पाकिस्तानमध्ये श्रीलंकेकडून पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव झाला. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. DLSच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचे लक्ष्य पाकिस्तानकडून ठेवण्यात आले होते. जे त्यांनी केवळ 42 षटकांमध्ये पूर्ण केले. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसने फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानेही 49 नाबाद धावा केल्या. त्यामुळे आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ भारतीय संघाविरूद्ध आशिया चषकासाठी खेळणार आहे.

- Advertisement -

परंतु आता आयसीसी क्रमवारी पाहता, पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून त्यांच्याकडे 3102 पॉइंट्स आणि 115 रेटिंग आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाकडे 4516 पॉइंट्स आणि 116 रेटिंग गुण आहेत. पहिल्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे 3061 पॉइंट्स आणि 118 रेटिंग गुण आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ पहिल्या पाच जणांमध्ये असून इंग्लंडचा संघ चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -