घरक्रीडाOmicron Variant : बांगलादेशच्या दोन महिला क्रिकेटपटूंना ओमिक्रॉनची लागण; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Omicron Variant : बांगलादेशच्या दोन महिला क्रिकेटपटूंना ओमिक्रॉनची लागण; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Subscribe

झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतलेल्या बांगलादेशच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे

काही दिवसांपूर्वीच झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतलेल्या बांगलादेशच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची अधिकृत माहिती बांगलादेश सरकारकडून देण्यात आली. बांगलादेशचा महिला संघ १ डिसेंबरला झिम्बाब्वेच्या मोठ्या दौऱ्यानंतर मायदेशी परतला आहे. दरम्यान, बांगलादेशचे आरोग्य मंत्री जाहिद मालेक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, संक्रमित आढळलेले दोन्ही खेळाडू हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात आहेत आणि ते ठिक आहेत. डॉक्टरांना आशा आहे की पुढील दोन आठवड्यात ते ठिक होतील. कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता मालेक यांनी म्हंटले की, संक्रमित झालेल्या महिला खेळाडूंचे वय २१ आणि ३० एवढे आहे.

दरम्यान, या दोन्ही महिला क्रिकेटपटूंना ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण झाल्याची बांगलादेशातील ही पहिलीच घटना आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीदेखील संपूर्ण संघ विलगीकरण कक्षात आहे आणि हा चिंतचा विषय नाही. असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार दोन्हीही क्रिकेटरांना झिम्बाब्वेमध्ये राहताना व्हायरल इन्फेक्शनची लागण झाली होती. त्यांनी १ डिसेंबरला झिम्बाब्वेला परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली होती त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. यानंतर सर्व महिला क्रिकेटरांनी ६ डिसेंबरला कोरोना चाचणी केली होती. मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.


हे ही वाचा : http://Rohit Sharma Captaincy : ‘भारताचा व्हाइट बॉल संघ सुरक्षित हातात; इतर कर्णधारांपेक्षा…,गंभीर यांचे रोहितबाबत मोठे वक्तव्य

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -