घरताज्या घडामोडीGold-Silver Rate : सोने-चादींच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे भाव?

Gold-Silver Rate : सोने-चादींच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे भाव?

Subscribe

सोने आणि चांदीच्या दरात आज(गुरूवार) वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चांदीचे दर ६१ हजार ५०० रूपयांच्या वर गेले आहेत. २४ कॅरेटच्या सोन्याच्या किंमतीत ३४९ रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेटच्या सोनाचे दर १० ग्रॅम ४८ हजार ४५ च्या वर गेले असून ४८ हजार ४१४ पर्यंत पोहोचले आहेत. चांदीचे दर पाहीले असता, चांदी ८२३ रूपयांनी महाग झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या वेबसाईटनुसार, कालच्या तुलनेत आज सकाळी २३ कॅरेटच्या सोन्याचे दर ३४७ रूपयांनी महागले असून प्रति १० ग्रॅम ४८ हजार २२० रूपये इतके झाले आहेत. तर २२ कॅरेटच्या सोन्याचे दर ३१९ रूपयांनी महागले असून ४४ हजार ३४७ रूपये इतके आहेत. या व्यतिरिक्त १८ कॅरेटच्या सोन्यामध्ये २६२ रूपयांची वाढ झाली असून प्रति १० ग्रॅम ३६ हजार ३११ रूपये इतके झाले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतरही गुंतवणुकीच्या उद्देशाने मालमत्ता वर्ग म्हणून डिजिटल सोन्याच्या वाढत्या पसंतीमध्ये मोठा बदल झाला आहे. कारण बाजारातील डिजिटल सोन्याचे पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यासाठी सर्वात सरळ आणि सुरक्षित मार्गांचा वापर करण्यात येतो.

दिल्लीतील बुलियन मार्केटमध्ये सोने २०९ रूपयांनी वाढून ४७ हजार ४०५ रूपये प्रति दहा ग्रॅम इतके झाले आहे. तर चांदीमध्ये ६१७ रूपयांच्या किंमतीत वाढ होऊन ६० हजार १७९ रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे. एमसीएक्सच्या किंमतीत ०.६१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Omicron Variant : ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -