घरक्रीडापुजाराच्या 'त्या' शब्दांमुळे माझा आत्मविश्वास वाढला; भारतीय गोलंदाजाने सांगितला किस्सा

पुजाराच्या ‘त्या’ शब्दांमुळे माझा आत्मविश्वास वाढला; भारतीय गोलंदाजाने सांगितला किस्सा

Subscribe

चेतेश्वर पुजाराने भारतीय गोलंदाजाला प्रोत्साहन दिले होते. 

भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होईल. या दौऱ्यासाठी भारताच्या २० सदस्यीय कसोटी संघात सहा वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले असून स्टॅन्ड बाय खेळाडूंमध्ये तीन वेगवान गोलंदाज आहेत. परंतु, सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतरही त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. परंतु, लवकरच राष्ट्रीय संघात पुनरागमन होईल अशी उनाडकटला आशा असून मागील वर्षी भारताचा फलंदाज आणि त्याचा सौराष्ट्र संघातील चेतेश्वर पुजाराने त्याला प्रोत्साहन दिले होते.

माझ्याशी अगदी स्पष्टपणे बोलतो

चेतेश्वर हा माझा जवळचा मित्र आहे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळत आहोत. मात्र, मागील वर्षी पहिल्यांदाच मी कसोटी क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे चेतेश्वर मला म्हणाला. त्याच्या या शब्दांमुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी चांगली कामगिरी करत नसल्यास तो मला माझी चूक सांगतो. पाच-सहा वर्षांपूर्वी मला दुखापत झाली होती. त्यानंतर मी फिटनेसवर अधिक मेहनत घेतली पाहिजे हे त्यानेच मला सांगितले होते. तो माझ्याशी अगदी स्पष्टपणे बोलतो, असे उनाडकट एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

रणजी करंडकात सातत्यपूर्ण कामगिरी

उनाडकटला २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात त्याला विकेट घेता आली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. त्याने रणजी करंडकात मात्र सौराष्ट्रकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २९ वर्षीय उनाडकटने २०१९-२० रणजी करंडकात सौराष्ट्रसाठी तब्बल ६७ विकेट घेतल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -