घरक्रीडा३३ गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती - मुख्यमंत्री

३३ गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती – मुख्यमंत्री

Subscribe

क्रिडाक्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिले आहेत.

महाराष्ट्रात शिक्षणासोबतच खेळालाही प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राकडून क्रिडाक्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देणार असल्याचे जाहीर केले आहे. यात एकूण ३३ खेळाडू असून एप्रिलमध्ये झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू राहुल आवारे याचाही या खेळाडूत समावेश आहे.

सामान्य २६ तर दिव्यांग १० खेळाडूंची नियुक्ती

मुख्यमंत्र्याकडे एकूण ९८ सामान्य खेळाडूंचे तर २६ दिव्यांग खेळाडूंचे अर्ज आले होते ज्यात ९८ पैकी २३ तर २६ दिव्यांग खेळाडूपैकी १० अशा एकूण ३३ खेळाडूंची थेट शासकीय सेवेत निवड करण्यात आली आहे. आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदीनीं उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

खेळाडूंनी आणखी यश संपादन कराव – मुख्यमंत्री

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या ३३ खेळाडूंना शासन सेवेत काम करत करत आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे अशी आशा मुख्यमंत्र्यानी यावेळी व्यक्त केली.

शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणारे खेळाडू – ललिता शिवाजी बाबर, जयलक्ष्मी सारीकोंडा, भक्ती अजित आंब्रे, अंकिता अशोक मयेकर, अमित उदयसिंह निंबाळकर, सारीका सुधाकर काळे, सुप्रिया भालचंद्र गाढवे, विजय सदाशिव शिंदे, राहुल बाळु आवारे, मोनीका मोतीराम आथरे, स्वप्नील त्र्यंबकराव तांगडे, आनंद दामोदर थोरात, सिध्दार्थ महेंद्र कदम, मानसी रवींद्र गावडे, नेहा मिलिंद साप्ते, रोहित राजेंद्र हवालदार, युवराज प्रकाश जाधव, बाळासाहेब सदाशिव पोकार्डे, कविता प्रभाकर घाणेकर, सचिन आनंदा चव्हाण, संजीवनी बाबुराव जाधव, देवेंद्र सुनील वाल्मिकी, सायली उदय जाधव.

- Advertisement -

वाचा – तर दुसर्‍या राज्यातून खेळण्याचा विचार! ओम लोटलीकरचे हताश उद्गार

शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणारे दिव्यांग खेळाडू – सुयश जाधव, लतिका माने, प्रकाश तुकाराम मोहारे, इंदिरा सत्ताप्पा गायकवाड, सुकांत इंदुकांत कदम, मार्क धरमाई, रुही सतीश शिंगाडे, दिनेश वसंतलाल बालगोपाल, ओम राजेश लोटलीकर, कांचनमाला पांडे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -